PM Narendra Modi : पाचव्या टप्प्यासाठी PM नरेंद्र मोदी सज्ज; मुंबईत रोड शो, कल्याण आणि नाशिकमध्ये जाहीर सभा

PM Narendra Modi Rally in mumbai : चौथा टप्पा पार झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी पाचव्या टप्प्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान मोदी हे देखील या टप्प्यासाठी सक्रिय झाले आहेत.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Saam tv

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान पार पडलं आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी पाचव्या टप्प्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान मोदी हे देखील या टप्प्यासाठी सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या कल्याण आणि नाशिकमध्ये जंगी सभा होणार आहेत. तसेच मुंबईत रोड शो होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कल्याण, भिवंडी, ठाणे लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी उद्या कल्याणमध्ये प्रचार सभा घेणार आहेत. त्याबरोबर नाशिकच्या पिंपळगावमध्येही त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर मुंबईत रोड शो असणार आहे. या दौऱ्यासाठी आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे.

PM Narendra Modi
Ghatkopar Hording Collapse: दुर्घटनास्थळीही नेत्यांचं राजकारण! घाटकोपर घटनास्थळी दोन भावी खासदार भिडले; VIDEO व्हायरल

कल्याणमध्ये जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जंगी सभा कल्याणमध्ये होणार आहे. पंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर हे बापगाव परिसरात उतरणार आहे. यामुळे यासाठी हेली पॅड तयार करण्यात आले आहे. हेली पॅडला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींची जाहीर सभा आधारवाडी जेल समोरील मैदानात होणार आहे. या मैदानात 50 हजाराहून अधिक आसन व्यवस्था असणार आहे. तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत देखील बदलण्यात आले आहेत. पोलिसांनी बदललेल्या मार्गांचे अधिसूचना जाहीर केली आङे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

PM Narendra Modi
Sanjay Raut Letter : 'नाशिकमध्ये ८०० कोटींचा घोटाळा, जनतेच्या पैशांची लूट'; संजय राऊतांचं थेट PM मोदींना पत्र

मुंबई रोड शोसाठी आज बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील रोड शो नियोजनासाठी आज बैठक होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियोजन समितीची बैठक बोलावली आहे. यामुळे मुलुंड येथे आज दुपारी ४ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला भाजपचे पदाधिकारी व नेते उपस्थित राहणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com