Hardik Pandya: 'मला त्याच्या नेतृत्वाची पद्धत आवडते..' हार्दिकला अंहकारी म्हणणाऱ्या डिव्हीलियर्सचं स्पष्टीकरण

Ab de villiers On Hardik Pandya: काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हीलियर्सने हार्दिकबाबत वक्तव्यं केलं होतं जे आता चर्चेत आलं आहे. आता त्याने स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ शेअर केला आहे.
Hardik Pandya: 'मला त्याच्या नेतृत्वाची पद्धत आवडते..' हार्दिकला अंहकारी म्हणणाऱ्या डिव्हीलियर्सचं स्पष्टीकरण
former cricketer ab de villiers issues clarfication on hardik pandya misquotes statement amd2000google

आयपीएल २०२४ स्पर्धेच्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला आपल्या संघात स्थान दिलं. त्यानंतर रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढलं आणि संघाची जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवली. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिलाच संघ ठरला. नेतृत्वात तर तो फ्लॉप ठरलाय यासह त्याला फलंदाजीत आणि गोलंदाजीतही हवी तशी कामगिरी करता आली नाही. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हीलियर्सने हार्दिकबाबत वक्तव्यं केलं होतं जे आता चर्चेत आलं आहे. आता त्याने स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ शेअर केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

एबी डिव्हीलियर्सने काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर वक्तव्य करत म्हटले होते की, ' हार्दिक पंड्या खुप धाडसी आहे. त्याच्या नेतृत्वात अहंकार जाणवतो. मला तरी वाटतं की, त्याचं मैदानावरील चालणं प्रामाणिक असते. त्याने असं ठरवलंय की हीच माझ्या नेतृत्वाची पद्धत आहे.' आता एबी डिव्हीलियर्सने या वक्तव्यावर मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला की, माझं वक्तव्य तोडून मोडून सादर करण्यात आलं आहे. पत्रकारीतेचा दर्जा खूप खालावला आहे.

Hardik Pandya: 'मला त्याच्या नेतृत्वाची पद्धत आवडते..' हार्दिकला अंहकारी म्हणणाऱ्या डिव्हीलियर्सचं स्पष्टीकरण
IPL 2024 Playoffs Scenario: मुंबई,पंजाबसह गुजरात स्पर्धेतून बाहेर! ३ स्थानांसाठी ६ संघांमध्ये चुरशीची लढत

एबी डिव्हीलियर्स म्हणाला की, 'मी स्पष्टपणे म्हटलं होतं आणि आता परत एकदा म्हणायलाही तयार आहे. मला हार्दिकच्या खेळण्याची पद्धत आणि नेतृत्वाची पद्धतही आवडते. मला इतकंच म्हणायचं आहे की, त्याने आपल्या नेतृत्वावर प्रचंड मेहनत घेतली आहे. तुम्ही मैदानात जा आणि धाडशी निर्णय घ्या ही अशी गोष्ट नाही.'

Hardik Pandya: 'मला त्याच्या नेतृत्वाची पद्धत आवडते..' हार्दिकला अंहकारी म्हणणाऱ्या डिव्हीलियर्सचं स्पष्टीकरण
RCB, IPL 2024: CSK विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का! संघातील २ प्रमुख खेळाडू स्पर्धेतून बाहेर

एबी डिव्हीलियर्सने जे काही म्हटलं होतं, ते चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलं आहे असा आरोप एबी डिव्हीलियर्सने केला आहे. त्याने हार्दिक पंड्याला सपोर्ट केला आहे. तो म्हणाला की, कधी कधी विरोधी संघावर दबाव बनवण्यासाठी हार्दिक अंहकार मध्ये आणतो. हार्दिक पंड्याला आयपीएल २०२४ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्सने या स्पर्धेत १३ सामने खेळले आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्स संघाला केवळ ४ सामने जिंकता आले. तर उर्वरीत ९ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com