RCB, IPL 2024: CSK विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का! संघातील २ प्रमुख खेळाडू स्पर्धेतून बाहेर

Will Jacks, Reece Topley Ruled Out: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना दिसून येणार आहे. या स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला मोठा धक्का बसला आहे.
Big blow for royal challengers bengaluru Will Jacks and Reece Topley Ruled Out of ipl 2024 due to national duty amd2000
Big blow for royal challengers bengaluru Will Jacks and Reece Topley Ruled Out of ipl 2024 due to national duty amd2000google

आयपीएल २०२४ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर उर्वरित ३ स्थानांसाठी ६ संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे धुतला गेला. त्यामुळे गुजरातचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणाऱ्या महत्वाच्या लढतीपुर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का बसला आहे.

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणारा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या संघाला जर प्लेऑफ गाठायचं असेल, तर कुठल्याही परिस्थितीत हा सामना दिलेल्या समीकरणानुसार जिंकावा लागेल. दरम्यान या सामन्यापूर्वी विल जॅक्स आणि रिस टोप्ली हे दोघेही मायदेशी परतले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या अधिकृत सोशल मीडियावर,हे दोघेही टी -२० वर्ल्डकपसाठी इंग्लंडला जात असल्याची घोषणा केली आहे.

Big blow for royal challengers bengaluru Will Jacks and Reece Topley Ruled Out of ipl 2024 due to national duty amd2000
Sunil Gavaskar Statement: 'IPL सोडून देशाकडून खेळणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी..' सुनील गावसकरांची BCCI कडे मागणी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेअर केला व्हिडिओ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संघातील सर्व खेळाडू आणि कोचिंग स्टाफमधील सदस्य असल्याचं दिसून येत आहे. सर्वांनी विल जॅक्ससाठी आणि रिस टोप्लीसाठी टाळ्या वाजवल्या. या दोन्ही खेळाडूंनी आपला या स्पर्धेतील अनुभव सांगितला. माध्यमातील वृत्तानुसार, रविवारी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यानंतर हे खेळाडू इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत.

Big blow for royal challengers bengaluru Will Jacks and Reece Topley Ruled Out of ipl 2024 due to national duty amd2000
IPL 2024 Playoffs: केव्हा आणि कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? तिकिटांची किंमत किती? वाचा एकाच क्लिकवर

विल जॅक्सचं संघाबाहेर पडणं हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी मोठा धक्का असणार आहे. कारण जेव्हा जेव्हा संघाला गरज होती, तेव्हा त्याने महत्वपूर्ण खेळी करत संघासाठी महत्वाची खेळी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com