IPL 2024 Playoffs: केव्हा आणि कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? तिकिटांची किंमत किती? वाचा एकाच क्लिकवर

IPL Playoffs Ticket Prize: आयपीएल २०२४ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून उर्वरीत ३ स्थानांसाठी उर्वरीत संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.
IPL 2024 Playoffs Schedule final ticket prize and prize booking process amd2000
IPL 2024 Playoffs Schedule final ticket prize and prize booking process amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून उर्वरीत ३ स्थानांसाठी उर्वरीत संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. कोलकाताला फायनलमध्ये जाण्याची दोनदा संधी मिळणार आहे. तर उर्वरीत ३ संघ कोणते हे जाणून घेण्यासाठी क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान प्लेऑफचे सामने केव्हा आणि कुठे खेळवले जाणार? जाणून घ्या.

केव्हा आणि कुठे रंगणार प्लेऑफचे सामने?

आयपीएल २०२४ स्पर्धेतील प्लेऑफचे सामने चेन्नई आणि अहमदाबादमध्ये रंगणार आहे. प्लेऑफचा पहिला सामना २१ मे रोजी अहमदाबादमध्ये रंगणार आहे. हा सामना क्वालिफायरचा सामना असणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. तर एलिमिनेटरचा सामना देखील याच मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना २२ मे रोजी खेळला जाणार आहे. तर क्लालिफायर २ चा सामना २४ मे रोजी चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे. स्पर्धेतील अंतिम सामना २६ मे रोजी अमहादाबादमध्ये रंगणार आहे.

IPL 2024 Playoffs Schedule final ticket prize and prize booking process amd2000
IPL 2024 Points Table: RCB च्या विजयाने CSKचं टेन्शन वाढलं! पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

तिकिटांची किंमत किती?

आयपीएलच्या फायनलच्या तिकिटांची किंमत अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र गेल्या हंगामातील तिकिटांची किंमत १,००० हे ४०,००० च्या घरात होती. त्यामुळे यावेळी आयपीएल स्पर्धेच्या सर्वात महागड्या तिकिटांची किंमत ४०,००० च्या पुढे जाऊ शकते.

IPL 2024 Playoffs Schedule final ticket prize and prize booking process amd2000
IPL 2024 Points Table: RCB च्या विजयाने CSKचं टेन्शन वाढलं! पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

कसं बुक करायचं तिकीट?

हे तिकीट तुम्ही Paytm Insider वरुन बुक करु शकता. हे तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला Paytm insider च्या अॅपवर जावं लागेल किंवा सांकेतिक स्थळावरुनही तुम्ही तिकीट बुक करु शकता. यासाठी तुम्हाला चेन्नई शहरावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर फायनलचं ऑप्शन येईल. त्यानंतर तुम्हाला Buy Now वर क्लिक करावं लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com