hsc board exam 2025 : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून (मंगळवार ११ फेब्रुवारी) सुरू होत आहे. १८ मार्च रोजी अखेरचा पेपर होणार आहे. राज्यात १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बारवीची परीक्षा देणार आहे. गतवर्षीपेक्षा यंदा विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
कॉपी बहादरांवर बोर्डाची करडी नजर असेल. परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथके असतील. बारावीच्या परीक्षेसाठी राज्यात एकूण दहा हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून आठ लाख १० हजार ३४८ विद्यार्थी, सहा लाख ९४ हजार ६५२ विद्यार्थिनी, आणि ३७ तृतीयपंथी यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील तीन हजार ३७३ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. विज्ञान शाखेला सात लाख 68 हजार 967 विद्यार्थी, कला शाखेला तीन लाख 80 हजार 410 विद्यार्थी, वाणिज्य शाखेला तीन लाख 19 हजार 439 विद्यार्थी तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम 31 हजार 735 विद्यार्थी, टेक्निकल सायन्स 4 हजार 486 असे एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
कॉपी बहादरांवर बोर्डाची करडी -
परीक्षा केंद्रावर गैर प्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे त्यांच्यावर दखल पात्र आणि अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाणार
संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेरा द्वारे ठेवण्यात येणार नजर
परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रकरण केले जाणार
सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथके व बैठकी पथके असणार
परीक्षा केंद्रांपासून 500 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार
तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येणार
योग्य नियोजनासह सकारात्मकतेने परीक्षांना सामोरे जा - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
जीवनात स्वतःशी स्पर्धा ठेवून प्रत्येक क्षण सकारात्मकतेने जगा. आत्मविश्वास वाढण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करा, उद्दिष्टांचे लहान लहान टप्पे करुन ते पूर्ण केल्याचा क्षण साजरा करा. तसेच परीक्षांचा ताण न घेता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, त्यातून नक्की यश मिळेल, असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
राज्यातील दहावी-बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतानाच परीक्षा ह्या कॉपीमुक्त, भयमुक्त वातावरणात व्हाव्यात या संकल्पनेला बळ देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून शुभेच्छा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा उद्या दिनांक ११ फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत. यानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्री भुसे म्हणतात, प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपल्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता बारावीची परीक्षा. ११ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी राज्यभरातील १५,०५,०३७ विद्यार्थी ३,३७३ केंद्रांवर परीक्षेला सामोरे जाणार आहेत.
तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी समुपदेशनाची सेवा उपलब्ध
इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास त्यांना मार्गदर्शन करणे व तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे विभागीय मंडळाच्या कक्षेतील पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे विभागीय सचिव औदुंबर उकिरडे यांनी कळविली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.