Belgaum News
Belgaum News  Saam tv
महाराष्ट्र

Belgaum : भाजपची बेळगावमध्ये मोठी राजकीय खेळी; पालिकेत बसवला मराठी महापौर

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगांवकर

Belgaum City Corporation News : बेळगावच्या महापौरपदी भाजपच्या शोभा सोमणाचे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर भाजपच्या रेश्मा पाटील उप महापौर निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. (Latest Marathi News)

बेळगाव (Belgaum) महानगरपालिका निवडणूक होऊन नगरसेवक निवडून आल्यावर तब्बल चौदा महिन्यांनी महापौर आणि उप महापौर निवडणूक घेण्यात आली.महापौर निवडणुकीसाठी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी अर्ज दाखल केला नाही त्यामुळे शोभा सोमणाचे यांची बिनविरोध निवड झाली.

उप महापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजप (BJP) तर्फे रेश्मा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर समितीतर्फे वैशाली भातकांडे यांनी अर्ज दाखल केला होता.रेश्मा पाटील यांना 42 मते तर वैशाली भातकांडे यांना चार मते मिळाली. निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित असलेले प्रादेशिक आयुक्त एम.जी.हिरेमठ यांनी महापौर आणि उप महापौर निवडणुकीचा निकाल जाहीर केला.

महापौर आणि उप महापौर निवडणूक झाल्या नंतर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.महापौर,उप महापौर निवडणुकीला सहा जण अनुपस्थित राहिले.तीन नगरसेवक तीन मिनिटे उशिरा आल्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला.यावेळी उशीर करून आलेल्या नगरसेवकांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली पण त्यांना सभागृहात प्रवेश देण्यात आला नाही.

सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले.त्या नंतर दुपारी तीन वाजता महापौर,उप महापौर निवडणुकीला प्रादेशिक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी एम. जी.हिरेमठ यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.निवडणूक झाल्या नंतर निवडणूक अधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी निवडणुकीचा निकाल घोषित केला.

भाजपने दिला मराठी महापौर

एकीकडे महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद चालू असतानाच दुसरीकडे आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने मोठी खेळी खेळली आहे. भाजपने चक्क बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदी मराठी चेहऱ्यांना बसवलं आहे. महापौरपदावर मराठी नगरसेविका शोभा सोमना तर उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुळजापूर: देवीच्या सोने-चांदी अपहार प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा अवमान याचिका दाखल करणार : हिंदु जनजागृती समिती

Pimpri Chinchwad Hoarding Collapsed: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळ्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा

Married Before 30 Years : तिशीच्या आत लग्न न केल्यास येतील 'या' अडचणी

Parenting Tips: मुलांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवायच आहे? तर या गोष्टी नक्की शिकवा

Ayodhya Poul: ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांना मारहाण; महिलेनं हिसकावला मोबाईल

SCROLL FOR NEXT