Ajit Pawar: चर्चा भाषणाची! 'अन् माझे केसच गेले...' अजित पवारांनी सांगितला रामदेव बाबांचा किस्सा; हसू आवरता आवरेना

या बुवा लोकांचं काही ऐकू नका, साधू संताचं ऐका, महापुरुषांचं ऐका, असे म्हणत अजित पवारांनी यावेळी चौफेर फटकेबाजी केली.
Ajit Pawar
Ajit PawarSaam Tv
Published On

सुशील थोरात...

Ahmednagar: विरोधी पक्षनेते अजित पवार त्यांच्या मिश्किल भाषणांसाठी आणि धडाकेबाज वक्तव्यांसाठी ओळखले जातात. राजकीय घडामोडींवरही अजित पवार रोखठोक मते व्यक्त करत असतात. जाहीर सभांमध्ये अजित पवारांच्या अशा मिश्किल भाषणांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते, ज्यामध्ये ते असे काही मुद्दे मांडतात, ज्यामुळे अनेकदा उपस्थितांमध्ये हशा पिकतो.

सध्या त्यांच्या अशाच एका वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे, ज्यामधून त्यांनी रामदेव बाबांचे नाव घेत टोला लगावला आहे. (Ajit Pawar)

Ajit Pawar
Jitendra Awhad: 'आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस; भाजपा पदाधिकाऱ्याची वादग्रस्त घोषणा

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखाना येथे शेतकऱ्यांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.

काय म्हणाले अजित पवार...

यावेळी बोलताना अजित पवारांनी "तुम्ही नखाला नख कशाला घासता, ते रामदेव बाबाने सांगितले म्हणून करता. रामदेव बाबाने सांगितले नखाला नख घास. मी केलं पण माझी सर्व केसं गेली. नवीन केस यायचं तर नावाच नाही," असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

Ajit Pawar
Beed News : जिल्हा शल्यचिकित्सकांनी Gate वरच घेतली कर्मचा-यांची हजेरी, 145 लेट लतीफांवर कारवाई

महापुरूषांच ऐका, बुवाबाबांचे नको..

यावेळी पुढे बोलताना" या बुवा लोकांचं काही ऐकू नका. साधू संताचं ऐका, महापुरुषांचं ऐका. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले यांनी सांगितलेले विचार ऐका. मौलाना आझाद असतील शाहू-फुले-आंबेडकर असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील या सर्व महान लोकांचे ऐका," असा सल्लाही अजित पवारांनी दिला.

आपल्या भाषणात त्यांनी "बुवाबाजी करणाऱ्यांचे ऐकू नका. नखाला नख घासून तिसरंच काहीतरी व्हायचं. डॉक्टरकडं जावं लागेल. डॉक्टर म्हणेल, हे कुणी करायला लावलं. पुन्हा डॉक्टरचा खर्च करावा लागेल," असे म्हणत तुफान फटकेबाजी केली. (Ahmednagar News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com