Jitendra Awhad: 'आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस; भाजपा पदाधिकाऱ्याची वादग्रस्त घोषणा

या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटत असून आव्हाडांविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.
jitendra awhad
jitendra awhad saam tv
Published On

Jalna News: अफजलखान आणि शायिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटत असून आव्हाडांविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

या विधानावर आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाकडून केली जात असतानाच जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास १० लाखांच्या बक्षीसाची वादग्रस्त घोषणा करण्यात आली आहे. (Jitendra Awhad)

jitendra awhad
Latur Congress: लातूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मतभेद; जिल्हा उपाध्यक्षांकडून जिल्हाध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप

याबाबत अधिक माहिती अशी की, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्याविरोधात भाजपकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. जालन्यातही आव्हाडांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.

यानंतर बोलताना भाजपा (BJP) ओबीसी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर “महाराष्ट्रातील जनतेला आवाहन आहे की, जितेंद्र आव्हाड दिसतील, तिथे त्यांची जीभ छाटावी. जो जीभ छाटेल त्याला १० लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल,” अशी घोषणा केली आहे.

jitendra awhad
Dell Layoff : मेटा आणि ॲपलनंतर आता आणखीन एक टेक कंपनी संकटात; ६६५० व्यक्तींना गमवावी लागणार नोकरी

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड...

राष्ट्रवादीचे नेते जिंतेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र सन्मान परिषदेत हे वादग्रस्त विधान केले होते. यावेळी बोलताना त्यांनी "एके दिवशी तावडेंनी विधानसभेत सांगितलं की, आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हटलं की, मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का?"

"समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना? शायिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे, असे वक्तव्य केले होते, ज्यानंतर या वादाला सुरूवात झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com