Beed News : जिल्हा शल्यचिकित्सकांनी Gate वरच घेतली कर्मचा-यांची हजेरी, 145 लेट लतीफांवर कारवाई

आज अचानक गेटवर तपासणी करण्यात आली.
Beed News
Beed Newssaam tv
Published On

Beed News : आतापर्यंत आपण तत्कालीन आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे हे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहिला असेल. मात्र बीडमध्ये (beed) जिल्हा रुग्णालयाचे सीएस डॉ. सुरेश साबळे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. थेट रुग्णालयाच्या (hospital) गेटवरचं खुर्ची टाकून बसत उशिरा येणाऱ्या डॉक्टर (doctor) आणि कर्मचाऱ्यांची त्यांनी हजेरी घेतली. (Maharashtra News)

Beed News
Satara News: रामराजे नाईक निंबाळकरांना काेणाचं राजकारण कळेना ?

या दरम्यान उशिरा येणाऱ्या तब्बल 145 डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली. त्यांचा अर्ध्या दिवसाचा पगार कपात होणार आहे. तसेच (beed) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी आदेश देखील काढले आहेत. यामुळं उशिरा येणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Beed News
NCP नेत्यांना पडळकरांनी संबाेधिले जितुद्दीन, अजरूद्दीन, शमशुद्दीन, रज्जाक; जनता त्यांची दखल घेईल

बीड जिल्हा रुग्णालयात एक-दोन नव्हे तर तब्बल 145 डॉक्टर आणि कर्मचारी उशिरा आल्याचे सर्च ऑपरेशन मध्ये आढळून आले आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज (साेमवार) सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य गेटवरच जिल्हा शक्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे हे खुर्ची टाकून किती कर्मचारी उशिरा येतात याची नोंद घेत होते.

यावेळी नऊ ते साडेदहा पर्यंत सर्च ऑपरेशन राबवले. यामध्ये तब्बल 145 कर्मचारी उशिरा येत असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान उशिरा येणाऱ्या तब्बल 145 कर्मचाऱ्यांचा अर्धा दिवसाचा पगार कपात करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी दिले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com