Vikas Bansode Case Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: जबर मारहाण, रक्त गोठलं, शरीर काळं निळं पडलं; विकास बनसोडेच्या पोस्टमॉर्टम अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Beed Aashti Vikas Bansode Case: बीडच्या आष्टी तालुक्यातील विकास बनसोडे हत्या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालातून विकास बनसोडेच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे.

Bhagyashree Kamble

विकास बनसोडे या तरूणाचा बीडच्या आष्टी तालुक्यात हत्या करण्यात आली होती. विकास बनसोडे याच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून विकास बनसोडेच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले आहे.

अति मारहाण, अंतर्गत रक्तस्त्राव आणि मानसिक धक्का बसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांना ताब्यात घेतलं आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आग अजूनही लोकांमध्ये धगधगत आहे. त्यानंतर असाच एक प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यात घडला. विकास बनसोडे या तरूणाला झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला.

मृत्यू झाल्यानंतर बनसोडेच्या भावानं पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार, १० जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रूग्णालयात पाठवण्यात आलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये विकास बनसोडेचा मृत्यू अतिमारहाणीमुळे झाला असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

अति मारहाण, अंतर्गत रक्तस्त्राव आणि मानसिक धक्का बसल्यामुळे विकास बनसोडे जीवानिशी गेला. बनसोडे हत्या प्रकरणात दहा जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्यातील आठ आरोपींना पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. उर्वरित दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Nashik Tourism : नाशिकला गेलाय? मग 'हा' ऐतिहासिक किल्ला नक्की पाहा

Vashi Fire : दिवाळीत संसाराची राखरांगोळी, वाशीतील आगीत ४ जणांचा मृत्यू

Amruta Khanvilkar : "दिवाळीचा फटाका"; 'चंद्रा'ला पाहून चाहते झाले सैराट

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाची उघडीप, 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT