Beed Saam
महाराष्ट्र

Beed Crime : शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरण! मृत्यू प्रकरणात भाजपच्या बड्या नेत्याचा हात, फरार आरोपीवर राजकीय वरदहस्त?

Beed Woman dowry case: बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील गीता गावातील शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात आता एक गंभीर राजकीय वळण पाहायला मिळत आहे.

Bhagyashree Kamble

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील गीता गावातील शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात आता एक गंभीर राजकीय वळण पाहायला मिळत आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर, पाचवा आरोपी फरार आहे. हा पाचवा आरोपी भाजपचा धारूर तालुकाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात त्याचाही सहभाग असल्याची माहिती आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

भाजप पदाधिकारी फरार

बर्दापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी सांगतात, संदीप काचगुंडे याच्या शोधासाठी दोन पोलीस पथक तयार करण्यात आले आहे. तो ज्या दिशेने पसार झाला असेल, त्या भागात शोध मोहीम राबवली जात आहे. मात्र, त्याच्या फरार होण्यामागे राजकीय आश्रय आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

शुभांगी शिंदेने सासरच्या छळाला कंटाळून घेतला गळफास

अंबाजोगाई तालुक्यातील गीता गावात राहणाऱ्या शुभांगी शिंदे हिने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती. याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. तिच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, आधीच चार लाख रुपये दिल्यानंतरही आणखी दोन लाख रुपयांची मागणी केली जात होती.

या घटनेनंतर शुभांगीचा भाऊ प्रदीप सोळंके यानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तात्काळ तपास करीत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. शुभांगीचा पती संतोष शिंदे, सासरे विलास शिंदे, सासू सुमन शिंदे आणि नणंद सीमा शिंदे यांना अटक केली आहे. मात्र, पाचवा आरोपी शुभांगीच्या पतीचा मित्र संदीप काचगुंडे अद्याप फरार आहे. त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना आज दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. मात्र, भाजप पदाधिकारी संदीप काचगुंडे याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सध्या पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गामुळे वारंवार पूर येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Maharashtra Politics: हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच खडसेंनी पत्रकार परिषदेतच महाजनांचा तो व्हिडिओ लावला | VIDEO

Congress Leader Dies : काँग्रेस नेत्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ

Atal Setu : आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास, 'अटल सेतू'मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

Digestion Tips: पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी नक्की करा 'हे' उपाय

SCROLL FOR NEXT