Beed–Parli Broad Gauge Track Prepares for Major Engine Test Saam
महाराष्ट्र

बीडकरांसाठी खूशखबर, बीड - वडवणीदरम्यान लवकरच रेल्वे धावणार; आज होणार इंजिन चाचणी

Beed–Parli Broad Gauge Track Prepares for Major Engine Test: बीड–वडवणीदरम्यान ६ डिसेंबर रोजी रेल्वे इंजिन चाचणी पार पडणार. १० आणि ११ डिसेंबर रोजी CRS तपासणीसह स्पीड रेल्वे चाचण्या होतील.

Bhagyashree Kamble

अहमदनगर - बीड - परळी या रेल्वे प्रकल्पातील बीड ते वडवणीदरम्यान नव्याने तयार झालेल्या ब्रॉडगेज मार्गावर ६ डिसेंबर रोजी इंजिन चाचणी पार पडणार आहे. त्यानंतर १० ते ११ डिसेंबर रोजी सीआरएस तपासणीसह स्पीड रेल्वे चाचण्या पार पडणार आहे. दरम्यान, अंतिम टप्प्यात आलेल्या या महत्त्वाच्या कामाकडे प्रशासनासह स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे. पुणे रेल्वे विभागाने याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली असून, चाचणी दरम्यान, सुरक्षिततेच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आलंय.

पुणे रेल्वे विभागानं प्रसिद्ध केलेल्या वेळेपत्रकानुसार,

६ डिसेंबर २०२५ रोजी रेल्वे इंजिन चाचणी पार पडणार आहे. तर, १० आणि ११ डिसेंबरला रेल्वे सुरक्षा आयुक्तांची तपासणी आणि स्पीड चाचण्या होणार आहे.

अहिल्यानगर–बीड रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता बीड–परळी रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. त्यातील सुमारे ३० किलोमीटरचा बीड–वडवणी टप्पा चाचणीसाठी सज्ज झाला आहे. या मार्गावर आज इंजिन चाचणी घेतली जात असून, सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत सर्व चाचण्या पार पडतील, अशी माहिती आहे.

या चाचण्यांमध्ये ट्रॅकची गुणवत्ता, उच्च वेग सहन करण्याची क्षमता, ब्रेकिंग सिस्टिम, तांत्रिक सुरक्षितता अशा विविध बाबींची सखोल तपासणी होणारेय. चाचण्यांचे निकाल समाधानकारक आल्यास पुढील टप्प्यात या मार्गावर प्रवासी रेल्वे सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती समोर आली आहे.

या रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिन चाचणी होत असल्याने स्थानिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रेल्वे ट्रॅक परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे ट्रॅकजवळील गावे, शेतकरी, गुरेढोरे मालक आणि स्थानिक नागरिकांना चाचणीच्या दिवशी दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळ्यात अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर 'एलसीबी'चा छापा

पत्नीचा मोबाईल रिचार्ज केला, पण सेवा ठप्पच राहिली; तरुणाचा पारा चढला अन् दुकानदारासोबत नको ते घडलं|VIDEO

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी आणि पोलिसांत शाब्दिक बाचाबाची|VIDEO

Devendra Fadnavis : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली डेडलाईन

Prajakta Gaikwad New Video: लग्नानंतर प्राजक्ताचा पारंपारिक पद्धतीने चुडा उतरवण्याचा कार्यक्रम; व्हिडीओ पाहून होतय सौंदर्याचं कौतुक

SCROLL FOR NEXT