इंडिगोमुळे इतर विमान कंपन्यांची चांदी, तिकीटांचे दर गगनाला भिडले, ५ हजाराचे तिकीट ५० हजारांवर

Delhi-Mumbai Tickets Touch 48000 on December 6: इंडिगो क्रायसिसमुळे अनेक उड्डाणे रद्द किंवा कमी करण्यात आली. परिणामी मागणी वाढली आणि उपलब्ध फ्लाइट्स कमी झाल्याने तिकिटांच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली.
Delhi-Mumbai Tickets Touch 48000 on December 6
Delhi-Mumbai Tickets Touch 48000 on December 6Saam
Published On

इंडिगो कंपनी सध्या कर्मचाऱ्यांकडून संकटात सापडली आहे. ६ डिसेंबर २०२५च्या विमान तिकिटांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. दिल्ली ते मुंबई या विमान प्रवासासाठी आता आपल्याला ४८,००० रूपयेपर्यंत मोजावे लागतील. तर, अंदमानला जाणाऱ्या विमान तिकिटांची किंमत ९२,००० रूपयांपर्यंत पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही इंडिगोची विमानसेवा रद्द करण्यात आली. तर, काहींची सुरू आहे. दरम्यान, १५ डियेंबरपर्यंत इंडिगो कंपनीने विमान सेवा सुरळीत करणार असल्याचं सांगितलं.

२०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आतंरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या आकडेवारीनुसार, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता आणि हैदराबाद दरम्यान प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे मार्ग भारताचे सर्वाधिक व्यस्त देशांतर्गत हवाई मार्ग ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Delhi-Mumbai Tickets Touch 48000 on December 6
पुण्यातील २ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन, पोलिस दलात मोठी खळबळ; नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फक्त एअर इंडिया, स्पाइसजेट विमान प्रवास होईल. दरम्यान, दिल्ली ते मुंबई एकेरी प्रवासाच्या तिकीटाचे दर सुमारे ६ हजार ते ६,२०० इतके आहे. पण आता तिकीटांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.

मुंबई ते दिल्ली

मुंबई ते दिल्ली दरम्यानच्या प्रवासाचे भाडे प्रति व्यक्ती २३,५८९ रूपये आकारले जात आहे. ज्याची एकेरी प्रवासाची सरासरी तिकट किंमत ६ हजार इतके आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील २ दिवसांसाठी फक्त एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि स्पाइसजेट दिल्ली विमानतळावरून प्रवास करतील.

Delhi-Mumbai Tickets Touch 48000 on December 6
कल्याणमध्ये जलवाहिनी फुटली, अनेक भागातील पाणी पुरवठा बंद, रस्ते अन् शाळाही बंद

दिल्ली ते कोलकाता

दिल्ली ते कोलकाता दरम्यान, थेट प्रवासाचे तिकीटाची किंमत २३,५८९ ते ४६,८९९ दरम्यान आहे. एमएमटीच्या आकडेवारीनुसार, सध्या फक्त एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि स्पाइसजेटट्या विमानांचे तिकीट बुकिंगसाठी उपलब्ध आहे.

कोलकाता ते दिल्ली

कोलकाता ते दिल्ली दरम्यान विमान तिकीटांचे दर २७,९९९ ते ३८,८०९ इतके आहे.यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार हे निश्चित. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या एअर इंडिया, अकासा एअर आणि स्पाइजेट या विमानसेवा सुरू आहेत.

दिल्ली ते बेंगळुरू

दिल्ली ते बेंगळुरू उड्डाणांचे दर सध्या ८०,०६९ रुपये ते ८८,४६९ रुपये (करांपूर्वी) इतके वाढले आहेत. सामान्य दिवसांत या मार्गाचे सरासरी तिकिटभाडे फक्त ७,१७३ रुपये असते.

दिल्ली ते अंदमान

६ डिसेंबर २०२५ रोजी एअर इंडिया दिल्ली ते अंदमान या मार्गावर फक्त एकच उड्डाण होणार आहे. या तिकिटाची किंमत ९२,०६७ रुपये (करांपूर्वी) झाली आहे. सामान्य दिवसांत या मार्गाचे तिकिट दर १२,००० ते २०,००० रुपये असतात.

दिल्ली ते हैदराबाद

दिल्ली ते हैदराबाद उड्डाणांचे भाडे ४९,२५९ रुपये ते ५०,६२८ रुपये दरम्यान विकले जात आहे. सध्या या मार्गावर केवळ एअर इंडिया एक्सप्रेस उड्डाणे सुरू आहेत. सामान्य दिवसांत वन-वे तिकिटाचे भाडे ५,५०० ते ६,००० रुपये असते.

इंडिगोचे विमान रद्द, प्रवाशांना मनस्ताप; पुढील तीन दिवस कुठलेही बुकिंग नाही

इंडिगोची सेवा ३ दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी छत्रपती संभाजी नगर विमानतळावरून दिल्लीचे रात्रीचे आणि मुंबईचे विमान रद्द करण्यात आले. त्यामुळे ५,५०० रुपये असलेले दिल्लीचे तिकीट थेट १७ ते २३ हजार रुपयांवर पोहोचले. इंडिगोच्या या अनपेक्षित निर्णयामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला, तर खासगी बसचालकांनीही संधी साधत दिल्लीसाठी प्रतिव्यक्ती सुमारे ४ हजारांवरून १० हजार रुपये भाडे आकारल्याचे दिसले.

यावर पुढचे तीन दिवस बुकिंग होणार नाही, थेट सोमवारी बुकिंग होईल, असे इंडिगोच्या काउंटरवरून प्रवाशांना सांगण्यात आले, खासगी तिकीट बुकिंग अॅपवर तिकीट दिसत असले तरी आम्ही काही सांगू शकत नाही, असे या वेळी प्रवाशांना कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता विमानसेवा कोलमडल्याने प्रवाशांना शिल्लक चे पैसे मोजावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com