Beed Crime Satish Bhosale Saam Tv
महाराष्ट्र

Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ 'खोक्या'च्या अडचणीत भर; अमानुष मारहण करणाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा

Satish Bhosale News : सतीश भोसले उर्फ 'खोक्या'च्या अडचणीत भर पडली आहे. बीडमध्ये अमानुष मारहण करणाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Vishal Gangurde

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात गरीब तरुणाला अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेच्या अडचणीत भर पडली आहे. गरीब तरुणाला मारहाण करणाऱ्या सतीश भोसले विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात एकच संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर सतीश भोसले विरोधात कारवाईची मागणी केली जात होती. त्यानंतर आज गुरुवारी बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यात सतीश भोसलेसह इतर ६ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसलेसह इतर ६ जनांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात जुने कलम 307 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात दोन अज्ञात आरोपी आहेत.

शिरूर तालुक्यातील बावी गावात अमानुष मारहाण प्रकरणी भाजपचा पदाधिकारी सतीश भोसले याच्यासह इतर ४ लोकांच्या विरोधात दिलीप ढाकणे यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. यामध्ये आरोपी सतीश भोसले उर्फ 'खोक्या', साईनाथ निराळ्या भोसले, अज्ञात साईनाथ भोसले यांचा मुलगा, अज्ञात सतीश भोसले यांचा मेहुणा, हरक्या निराळ्या भोसले, निराळ्या भोसले या आरोपींविरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये नवीन कलमानुसार विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय.

सतीश भोसले यांच्या शोधासाठी शिरूर पोलिसांनी दोन पथक पुणे आणि इतर भागांमध्ये पाठवले आहेत. सतीश भोसले याच्यासह इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी हे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

SCROLL FOR NEXT