Crime News: आणखी एका सरपंचावर प्राणघातक हल्ला, लोखंडी रॉडनं फोडलं डोकं; बुलढाणा हादरलं

Ex-Sarpanch Injured in Buldhana Attack Case: बुलढाण्यातील खामगावमध्ये माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात माजी सरपंच यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
Buldhana
BuldhanaSaam Tv News
Published On

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट पेटलेली असतानाच आणखी एका माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. बुलढाण्यातील खामगावमध्ये माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सरपंचांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बुलढाण्यातील खामगावात एक धक्कादाक घटना घडली आहे. खामगावातील माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. निलेश देशमुख असं माजी सरपंचाचे नाव आहे. तर, मयूर सिद्धपुरा अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. मयूर आणि त्यांच्या साथीदाराने मिळून माजी सरपंचावर हल्ला केला होता.

Buldhana
Bhayyaji Joshi: भैय्याजी जोशींचं वक्तव्य देशद्रोह; संजय राऊत संतापले, मुख्यमंत्र्यांकडे केली विशेष मागणी

क्षुल्लक कारणावरून माजी सरपंच आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. नंतर आरोपीनं थेट लोखंडी रॉडनं निलेश यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात सरपंच निलेश देशमुख थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आरोपींनी हल्ला केल्यानंतर तेथून पसार झाले.

Buldhana
India/ Pakistan: 'या' एका वस्तूसाठी भारत आजही पाकिस्तानवर अवलंबून

याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. हल्ला करणाऱ्यांमधील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मयूर सिद्धपुरा असे आरोपीचे नाव आहे. हल्ल्यात जखमी झालेले माजी सरपंच निलेश देशमुख यांच्यावर खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com