Beed students running on highway Saam Tv
महाराष्ट्र

BEED: मॅरेथॉनसाठी हायवेवर धावण्याची प्रॅक्टिस, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; शिक्षकांची अजब उत्तरं; VIDEO व्हायरल

Beed Students Running On Highway: बीडमध्ये मॅरेथॉनसाठी धावण्याची प्रॅक्टीस करण्यासाठी विद्यार्थ्या चक्क हायवेवर धावले. शिक्षकांनीच या विद्यार्थ्यांना हायवेवर धावण्यास लावले. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. धावण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी बीड - अहिल्यानगर हायवेवरून विद्यार्थ्यांना पळवण्यात आले. मॅरेथॉनसाठी प्रॅक्टीस करण्यासाठी या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी चक्क हायवेवरून पळवलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आली आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातील खोकरमोहा जिल्हा परिषद शाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे. तर शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षण प्रेमींनी केली आहे. या घटनेची चौकशी करून दोषी शिक्षकांवर कारवाही करू अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या शिरूर तालुक्यातील खोकर मोहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ही घटना घडली. बीड- अहिल्यानगर नॅशनल हायवेवरती चक्क विद्यार्थ्यांना पळवत धावण्याची प्रॅक्टिस करून घेण्यात आली. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांकडून चक्क हायवेवरती धावण्याची प्रॅक्टिस करून घेतली जात आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका पोहोचेल असं कृत्य बीडच्या खोकरमोहा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी केलं आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणावरती तात्काळ चौकशी समिती नेमून दोषी शिक्षकांवर कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर हा संपूर्ण प्रकार खेदजनक असून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे कृत्य शिक्षकांनी केले आहे. या शिक्षकांवर तात्काळ कारवाई करून त्यांना सेवेतून मुक्त केले पाहिजे अशी मागणी शिक्षणप्रेमींनी केली आहे.

तर शाळेचे मुख्याध्यापक यांनी असे म्हटले आहे की, हा प्रकार चुकीचा असून आम्ही शिक्षकांना समज देऊ. मॅरेथॉनमध्ये दहा ते बारा विद्यार्थी सहभागी झाले होते. हायवेवर धावण्याचा सराव करण्याचा हा प्रकार चुकीचा असून यापुढे असे घडणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊन. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालकांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

Maharashtra Rain Live News: खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद

Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

Online Gaming Ban Bill : ऑनलाइन गेम खेळणं बंद होणार? केंद्राचं विधेयक, ऑनलाईन गेम 'ओव्हर'

SCROLL FOR NEXT