beed news  Saam tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh : संतोष देशमुखांचा अमानुष छळ पाहून अस्वस्थ झाला; २३ वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Santosh Deshmukh News : संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचा अमानुष छळ पाहून एकाने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

योगेश काशिद, साम टीव्ही

संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधील राजकारण तापलं आहे. देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर एकच संताप व्यक्त केला जात आहे. देशमुखांची क्रूरपणे हत्या करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक फोटो पाहिल्यानंतर एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या वेळचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळचे १५ व्हिडिओ आणि ८ फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केल्याचे दिसत आहे. आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपी हसतानाही दिसत आहे. एका आरोपीने संतोष देशमुख यांच्या चेहऱ्यावर लघूशंका देखील केल्याचे समोर आले आहे.

संतोष देशमुख यांचा अमानुष छळ बघावला न गेल्याने केज तालुक्यातील जानेगाव येथील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या वेळीचे फोटो बघावले न गेल्यामुळे केजच्या जानेगावमधील तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दोषारोप पत्रातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमुळे मोठा आक्रोश बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला हे फोटो न पाहावल्यामुळे केज तालुक्यातील जानेगाव येथील एका तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले आहे.

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो पाहून धक्का बसल्याने जानेगाव येथील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय तरुणाने धक्क्यातून टोकाचे पाऊल उचलले आहे. या तरुणाचे नाव अशोक हरिभाऊ शिंदे असून त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोप पत्रातील व्हायरल झालेले फोटो पाहून केज तालुक्यातील जानेगाव येथील शिंदे हे प्रचंड विचलित आणि अस्वस्थ झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

मोठी बातमी! राहुल गांधीच्या आंदोलनावर मोदी सरकारचं प्रत्युत्तर, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांनी केले गंभीर आरोप

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT