Violent aftermath of a family land dispute in Beed where a nephew attacked his uncle and cousin with a sword. saam tv
महाराष्ट्र

बीडमध्ये रक्तरंजित हल्ला; पुतण्याने काकाचे बोट छाटले, चुलत भावावरही तलवारीने वार

Beed Land Dispute Violent Attack Case Details: बीड जिल्ह्यातील रुई शहाजानपूर येथे शेतीच्या वादातून पुतण्याने काकावर तलवारीने हल्ला करत हाताचे बोट छाटल्याची धक्कादायक घटना. चुलत भावावरही जीवघेणा वार; आरोपी अद्याप फरार.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

बीड: जिल्ह्यातील रुई शहाजानपूर येथे शेतीच्या वादातून धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पुतण्यानेच आपल्या काकावर तलवारीने हल्ला करत त्यांच्या चुलत भावावरही गंभीर वार करत त्यांच्या हाताचे बोट छाटल्याची घटना घडली असून, याच हल्ल्यात चुलत भावावरही गंभीर वार करण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओही समोर आला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना 24 जून रोजी घडली. जखमीवर सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर येथे उपचार करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामू सोपान घुमरे यांची रुई शहाजानपूर गावात चार एकर शेती आहे. या शेतीच्या विक्रीवरून घुमरे कुटुंबामध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होते. हा वाद इतका टोकाला गेला की पुतण्या अतुल घुमरे याने संतापाच्या भरात चुलते रामू घुमरे यांच्यावर तलवारीने हल्ला करत त्यांच्या हाताचे बोट छाटले. तसेच चुलत भाऊ बाळासाहेब घुमरे याच्यावरही तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला.

घटनेनंतर दोघा जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जखमांची गंभीरता लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. आठवडाभर उपचारानंतर दोघेही घरी परतले आहेत. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित आरोपींना तातडीने अटक करून न्याय मिळावा, अशी मागणी पीडित कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

...तर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचंही पद जाणार; मंत्र्यांचीही होणार हकालपट्टी, मोदी सरकार आणणार नवा कायदा

Crime News : भावोजीच्या प्रेमात आकंठ बुडाली विवाहित मेहुणी; स्वतःच्याच बहिणीच्या हत्येचा रचला कट, पण स्वतःच गमावला जीव

200 कोटींचा कर्ज घोटाळा, ईडीचे एकाचवेळी 17 ठिकाणी छापे; मुंबई-दिल्लीत खळबळ

Maharashtra News Live Update: केज तालुक्यातील टाकळी येथील घुले कुटुंबाचे आंदोलन स्थगित

सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला मिळाली 35 कोटींची ऑफर; सरकार पाडण्याचा होता कट? राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT