Beed Crime News  Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : सरपंचपदाचा राजीनामा का देत नाही? महिलेवर १५ ते २० जणांचा जीवघेणा हल्ला; बीडच्या परळीत खळबळ

Beed Crime News : बीडमध्ये सरपंच आणि तिच्या कुटुंबीयांवर जोरदार हल्ला केला. बीडमधील १५ ते २० जणांनी जीवघेणा हल्ला केला.

Vishal Gangurde

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडच्या वसंतनगर ग्रामपंचायतच्या महिला सरपंचसह कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेत ५ ते ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेतील जखमींना अंबाजोगाई दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर हल्लाखोरांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे. सरपंचपदाचा राजीनामा का देत नसल्याने १५ ते २० जणांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या परळी तालुक्यातील लमानतांडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वसंतनगर ग्रामपंचायत महिला सरपंचसह कटुंबावर गावातील १५ ते २० लोकांनी प्राण घातक हल्ला केला. सरपंचदाचा राजीनामा का देत नाही म्हणून हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सरपंचाच्या राठोड कुटुंबातील ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचावर अंबाजोगाई येथील स्वराती सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. हल्लाखोरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राठोड कुटुंबीयांनी केली आहे.

नेमकं काय घडलं?

वसंतनगर तांडा येथे रात्री नऊ वाजता माजी सरपंच दत्तात्रय सखाराम राठोड यांच्या सांग्यावरून महिला सरपंच शाहूबाई विजय राठोड सरपंचपदाचा राजीनामा का देत नाही म्हणून पूर्ण कुटुंबावर जीवघेणा करण्यात आला. या गावातील रवी रामराव चव्हाण, विकास रामराव चव्हाण , अजित बबन चव्हाण , नितीन गजानन उर्फ गजानद चव्हाण, अभिजित बबन चव्हाण आणि इतर पंधरा ते वीस जणांनी मिळून सरपंचसह कुटुंबातील आठ जणांवर प्राणघातक हल्ला केला.

त्यानंतर जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार माजी सरपंच दत्ता सखाराम राठोड असल्याची प्रतिक्रिया महिला सरपंचपाचे विजय राठोड यांनी दिली आहे. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holidays List 2025: देशभरातील बँकांना आठवडाभरात बंपर सुट्ट्या; जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Maharashtra Live News Update: : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी मोठी अपडेट; हगवणे कुटुंबांतील सदस्यांचा जामीन फेटाळला

Crime : कौटुंबिक वाद टोकाला पोहोचला, सावत्र मुलीसमोर नवऱ्याचं बायकोसोबत भयंकर कृत्य; बस स्टँडवर काय घडलं?

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंचं ठरलं! दिवाळीत युती; दोन फॉर्म्युल्यावर चर्चा, कोणत्या भावाला किती जागा मिळणार?

Chanakya Niti: आयुष्यभर तुमच्यावर पडेल पैशाचा पाऊस, फक्त या ७ गोष्टी फॉलो करा! चाणक्य निती काय सांगते?

SCROLL FOR NEXT