Rohit Patil : सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन रोहित पाटील कडाडले

Rohit Patil On Farmer Issue :यवतमाळमध्ये रोहित पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी लढण्याचेही आश्वासन दिलं.
rohit patil News
rohit patil Saam tv
Published On

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे गर्दीहून लक्षात येत आहे. ही यात्रेतील मागणीतील अपेक्षांचं ओझं बच्चू भाऊच्या एकट्याच्या खांद्यावर टाकणे योग्य नाही, असं म्हणत आमदार रोहित पाटील यांनी सरकारवर टीका केली. ते यवतमाळमध्ये बोलत होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावे. शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा व्हावा, या मागणीसाठी बच्चू कडू यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मागील वर्षांपासून कडू यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात दंड थोपटलं आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या ७/१२ कोरा यात्रेच्या समारोप सभेत रोहित पाटील यांनी हजेरी लावली. या सभेतून रोहित पाटील यांनी सरकावर जोरदार टीका केली.

rohit patil News
Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

रोहित पाटील यांच्या भाषणातील मुद्दे

शाळेमध्ये शेतकऱ्यांची पोर शिकतात, त्या शाळांची अवस्था काय आहे? कर्जमाफी का म्हणतोय, कारण सुखा समाधानाने आम्हाला जगता येत नाही. ते आयुष्य जगण्याचा आधिकार शासनाच्या धोरणातून दिसत नाही. पंजाबच्या सीमेवर तेथील शेतकरी दिल्लीचा सीमेवर जाऊन आंदोलन करत होता. संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होते.

rohit patil News
Pravin Gaikwad : प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; दीपक काटेंसह 7 जणांवर अक्कलकोटमध्ये गुन्हा

शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून एकमेव मंत्री आहे. जो शेतकऱ्यांबरोबर आंदोलनामध्ये मिसळला. त्या मंत्र्यांचे नाव बच्चू भाऊ कडू होता. त्यांचा हेतू प्रामाणिक होता. त्यांच्यासाठी रक्त गाळू.

rohit patil News
Sambhaji brigade : गायकवाडांना एकट्यात गाठून हल्ला करणे नामर्दाची #@&^%; काळं फासल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक, भाजपवर केला गंभीर आरोप

राज्यातील कृषिमंत्र्यांनी सांगितले की, मी सुद्धा द्राक्ष भागातून येतो. त्यांना द्राक्षे कसे उगवतात हे माहिती नव्हतं. आजचा जनसमुदाय ऐकण्याची गरज त्यांना आहे. मंत्री द्राक्षाचे नुकसान पाहायला जातात. ते शेतऱ्यांना ढेकळ्याचा पंचनाचा करावा का म्हणतात? या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, आर आर आबांचा मुलगा म्हणून तुमच्या मागण्यांसाठी उभा असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com