Pravin Gaikwad : प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; दीपक काटेंसह 7 जणांवर अक्कलकोटमध्ये गुन्हा

Pravin Gaikwad News : प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी मोठी अपडेट हाती आलं आहे. या प्रकरणी दीपक काटेंसह 7 जणांवर अक्कलकोटमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Pravin Gaikwad News
Pravin GaikwadSaam tv
Published On

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्क्लकोटमध्ये शाईफेक केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणी शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे यांच्यासह ७ जणांवर अक्कलकोट पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आलाय. संभाजी ब्रिगेडचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांनी सोलापूरच्या अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी भोसले रात्री उशिरपर्यंत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात ठाण मांडलं.

शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे, किरण साळुंखे, भैय्या ढाणे, कृष्णा क्षीरसागर, अक्षय चव्हाण, बाबू बिहारी, भवानेश्वर बबन शिरगिरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करताना सर्व जण सोलापूरमध्ये होते. हल्ल्यानंतर सोलापुरात डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शिवसह्याद्री आरोग्य धाम या क्लिनिकमध्ये प्रवीण गायकवाड यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर सोलापूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलून प्रवीण गायकवाड हे अकलूजकडे रवाना झाले आहेत.

प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारे दीपक काटे आणि त्यांचे सहकारी हे इंदापूर तालुक्यातून आले असल्याचे समजत आहे. प्रवीण गायकवाड येण्यापूर्वी काटे आणि त्यांचे सहकारी येऊन थांबले होते. त्यांनी पहिल्यांदा गायकवाड यांच्यावर शाई ओतली. त्यानंतर गाडीत बसलेल्या गायकवाडांना बाहेर काढून त्यांच्यावर हल्ला करण्यात आलाय. संभाजी भोसले आणि सहकाऱ्यांनी प्रवीण गायकवाड यांना बाजूला नेले.

संभाजी भोसले यांनी अक्कलकोट पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक काटे याच्यासह सात जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी संभाजी भोसले हे अक्कलकोट पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते.

Pravin Gaikwad News
Sambhaji brigade : गायकवाडांना एकट्यात गाठून हल्ला करणे नामर्दाची #@&^%; काळं फासल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक, भाजपवर केला गंभीर आरोप

प्रवीण गायकवाड यांचा पंढरपुरात दुग्धाभिषेक

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा पंढरपुरात दुग्धाभिषेक करण्यात आला. प्रवीण गायकवाड यांना काळे फासल्यानंतर पंढरपुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आलं. संभाजी ब्रिगेड आणि पुरोगामी संघटनांच्या तरुणांनी गायकवाड यांचे स्वागत केले. पुष्पवृष्टी करत पंढरपुरात प्रवीण गायकवाड यांचे स्वागत झाले. अक्कलकोट येथील काळे फासलेल्या प्रकरणानंतर पंढरपुरात जंगी स्वागत करण्यात आलं. फटाक्यांच्या आतिशबाजीत गायकवाड यांचं स्वागत‌ झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com