Sambhaji brigade : गायकवाडांना एकट्यात गाठून हल्ला करणे नामर्दाची #@&^%; काळं फासल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक, भाजपवर केला गंभीर आरोप

Sambhaji brigade on pravin gaikwad attack : प्रवीण गायकवाड यांना काळं फासल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजी ब्रिगेडने भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
Sambhaji brigade News
Sambhaji brigadeSaam tv
Published On

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासल्यानंतर पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या आहेत. प्रवीण गायकवाड यांच्यासोबत झालेल्या कृत्याच्या विरोधात राजकीय नेते आणि पुरोगामी संघटनांनी निषेध नोंदवला आहे. गायकवाड यांनीही माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला. यानंतर आता संभाजी ब्रिगेडही आक्रमक झाली आहे. 'मर्दाला एकट्यात गाठून हल्ला करणे नामर्दाची #@&^% आहे,अशा कठोर शब्दात संभाजी ब्रिगेड यांनी शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांना आव्हान दिलं आहे.

संभाजी ब्रिगेडने पत्रक काढत प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा निषेध नोंदवला. संभाजी ब्रिगेडने यावेळी सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप केला. संभाजी ब्रिगेडने पत्रक काढत म्हटलंय की, 'संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे १३ जुलै २०२५ रोजी अक्कलकोट याठिकाणी पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवून भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव दीपक सीताराम काटे आणि त्याच्या साथीदारांनी पूर्वनियोजितपणे शाईफेक करून भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केला. मर्दाला एकट्‌यात गाठून हल्ला करणे ही नामर्दाची ##@&^% आहे'.

Sambhaji brigade News
Pravin gaikwad : माझ्या हत्येचा कट, पुरोगामी कार्यकर्ते असुरक्षित; काळं फासल्यानंतर प्रवीण गायकवाडांनी कोणती भीती व्यक्त केली?

'संभाजी ब्रिगेड संघटनेचं नाव बदलून धर्मवीर संभाजी ब्रिगेड करा, अन्यथा घरात घुसून मारू अशी खुलेआम धमकी मागच्या काही महिन्यांपासून या भाजपच्या गुंडांकडून दिली जात होती. भाजपचा पदाधिकारी असल्याने त्याच्यावर सोलापूरकर, कोरटकर प्रमाणेच सरकारने कारवाई केली नाही हे उघड आहे. हीच आधुनिक पेशवाई आहे, असेही संघटनेने म्हटलं.

'गेली ४० वर्षे सामाजिक क्षेत्रात तरुणांना दिशा देण्याचे काम करणाऱ्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याची ही घटना शासन, प्रशासन आणि पोलिस खात्याचे धिंडवडे काढणारी आहे. ही सरकारी यंत्रणेची सपशेल हार आहे. फडणवीसांच्या काळात कदाचित हेच अपेक्षित आहे. पेशवाई यापेक्षा वेगळी नसावी, नुकताच राज्य सरकारने राज्यात जनसुरक्षा कायदा मंजूर करून डाव्या विचारांच्या संघटनांवर कारवाईचे संकेत दिले आहेत, त्या पार्श्वभूमीवर उजव्या विचारांच्या संघटनांची ही दादागिरी सरकार पुरस्कृत आहे का? असा सवाल संभाजी ब्रिगेडने विचारला.

Sambhaji brigade News
Shocking : हॉस्टेलमध्ये घुसून मुलींवर अत्याचार; आरोपी लोकांच्या तावडीत सापडला, पोलीस ठाण्यात हत्येचा थरार

'दिपक काटे, भिडे यांना हा कायदा लागू होणार नसेल, तर आम्ही त्याची होळी करतो. या लोकांवर कारवाई न करता त्यांना असे हल्ले करण्याची मुभा दिली जाणार आहे का? फडणवीसांना हेच भ्याड हल्ले अपेक्षित आहेत का? हा सरकार पुरस्कृत दहशतवादी हल्ला आहे का? असाही सवाल त्यांनी विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com