Parali News Saam tv
महाराष्ट्र

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Beed Parali News : एसडीआरएफची टीम किंवा हेलिकॉप्टर मदतीसाठी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. आ. मुंडे स्वतः घटनेवर लक्ष ठेवले असून त्यांचे कार्यालय प्रशासनाशी सातत्याने संपर्कात

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: ममदापूर-बोरखेड मार्गावरील कौडगावहुडा जवळ पुलावरून जात असताना चारचाकी गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. या कारमध्ये चार तरुण होते. त्यापैकी तिघांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर, एक तरुण अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. बीडच्या परळी तालुक्यातील कौडगाव हुडा गावाजवळ रविवारी मध्यरात्री हि दुर्घटना घडली आहे.

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. यात परळी तालुक्याला देखील पावसाने झोडपून काढले आहे. यात जोरदार पावसामुळे परळी तालुक्यातील कौडगाव हूडा गावाजवळ असलेल्या छोट्या ओढ्याला मोठा पूर येऊन नदीचे स्वरूप धारण केले होते. या पुराच्या पाण्यातून कार काढण्याचा प्रयत्न करताना तरुणांना पुराच्या पाण्याचा अंदाज आला नाही. त्यांना पुलावरून गाडी जाईल असे वाटले आणि त्यांनी गाडी पुलावर चढवली. मात्र, पाण्याच्या जोरदार वेगाने कार वाहून गेली. ही घटना रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली.

तिघांना वाचविण्यात यश 

पाण्यात कार वाहून जात असताना प्रसंगावधान राखून तरुणांनी कारमधून उड्या मारल्या आणि पात्रातील झाडावर चढून बसले. त्यापैकी अमर पौळ (वय २५), राहुल पौळ (वय ३०, रा. डिग्रस) व राहुल नवले (वय २३, रा. पुणे) यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र विशाल बल्लाळ (रा. पुणे) हा तरुण अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. पुराच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने बचावकार्य अधिक कठीण झाले आहे.

दरम्यान परळी मतदार संघाचे आमदार धनंजय मुंडे रात्रीपासून प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांच्या सूचनेनुसार बचावकार्यासाठी पुणे येथून एनडीआरएफचे पथक तातडीने बोलावण्यात आले आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिस ठाण्याचे ठाणे प्रमुख दहीफळे यांच्यासह एसडीओ, डीवायएसपी, तहसीलदार व एपीआय यां घटनास्थळी दाखल होत रात्रीपासून त्यांचे बचावकार्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: व्यवसायात भरभराट होईल पण पैसाही तितकाच खर्च होईल; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

भारतात पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी? सैन्य दल हायअलर्ट मोडवर, VIDEO

लोकशाहीची लक्तरं, मतदानाची दुकानं, महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस, वॉशिंग मशिन, मिक्सर,चांदीचं वाटप

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना! ट्रकच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा मृत्यू

मतदानाआधी पैशांनी भरलेली बॅग आढळली, पाकीटं अन् ५०० च्या नोटाच नोटा! VIDEO

SCROLL FOR NEXT