Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाची गुंडागिरी, तरुणावर जीवघेणा हल्ला; गावंदरा गावातील घटना

Beed News Today: कुऱ्हाडी व कोयत्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाच्या घरावर दगडफेक...

विनोद जिरे

Beed Crime News: क्षुल्लक कारणावरून भाजप कार्यकर्ता असणारा उपसरपंच बिभीषण बडे यांनी गुंडांकडून कुऱ्हाडी व कोयत्याने तरुणांवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या गावंदरा गावात उघडकीस आला आहे. यात रामप्रभू बडे हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

मारहाण करून हातात कोयता घेवून गावात दहशत निर्माण करणाऱ्याचा व्हिडिओ कैमेऱ्यात कैद झाला आहे. तसेच हा गोंधळ मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Beed News)

विशेष म्हणजे गावात मिरवणूक सुरू असताना ही मारहाण करण्यात आलीय. पाच ते सात जणांनी कोयत्याने व कुऱ्हाडीने हल्ला केला. यावेळी गावातली काही मंडळी धावल्याने रक्त्याच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला सोडून त्यांनी पळ काढला. त्यानंतर पुन्हा मध्यरात्री पीडित तरुणाच्या घरावर दगड फेक केली व पळून गेले. दरम्यान या हल्ल्यामुळे कुटुंबात दहशत निर्माण झाली आहे. (Beed Crime)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डिझेलसाठी 2-4 किमीच्या रांगा; दोन दिवसांपासून पुरवठा ठप्प

SBI Jobs: खुशखबर! स्टेट बँकेत नोकरीची संधी; ८२१ पदांसाठी भरती जाहीर; पगार ₹८०,०००; अर्ज कसा करावा?

Type 2 diabetes: पुरेशी झोप घेऊनही थकवा जात नाही? टाइप 2 डायबिटीजची ही ५ लक्षणं वेळेत ओळखा

Political News : मोठी बातमी! दिल्लीत बड्या नेत्याच्या घरावर ED ची धाड, राजकारणात खळबळ

Lipstick Shades: ग्लॉसी की मॅट? कोणत्या लिपस्टिकने मिळेल ग्लॅमरस आणि परफेक्ट लूक

SCROLL FOR NEXT