Santosh Deshmukh Case :  Saam tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : 'मला हे लोक...' अपहरणावेळी देशमुखांचं शेवटचं वाक्य काय होतं? जबाबातून महत्वाची माहिती समोर

Santosh Deshmukh Case update : अपहरणावेळी संतोष देशमुख यांचं शेवटचं वाक्य समोर आलं आहे. संतोष देशमुख प्रकरणाच्या जबाबातून महत्वाची माहिती समोर आली आहे.

Vishal Gangurde

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत आहेत. संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांना अपहरणादरम्यान हत्येची चाहूल लागली होती. या प्रकरणाचा अत्यंत महत्वाचा जबाब साम टीव्हीच्या हाती लागला आहे. संतोष देशमुख प्रकरणातील अत्यंत महत्वाच्या जबाबामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

संतोष देशमुख यांचं अपहरणावेळी त्यांच्यासोबत असलेल्या चालकाच्या जबाबातून ही माहिती समोर आली आहे. टोल नाक्यावर संतोष देशमुख यांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत टाकण्यात आलं. स्कॉर्पिओमध्ये टाकून अपहरण करताना संतोष देशमुख आपल्या सोबत असलेल्या चालकाला म्हणाले की, पोलीस स्टेशनला लवकर जा. मला हे लोक जिवे मारणार आहेत. असे म्हणल्यानंतर आरोपींनी संतोष देशमुख यांना लगेच घेऊन ती गाडी केजच्या दिशेने नेली'.

प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने जबाबात काय म्हटलं?

सरपंच संतोष देशमुख यांच अपहरण झालं, त्यावेळी कार चालवत असलेल्या व्यक्तीला कोयता लावला गेला. त्यानंतर त्या व्यक्तीने धनंजय देशमुखांना तातडीने घटनाक्रम सांगितला. धनंजय देशमुख यांनी त्यांच्यासह लगेच केज पोलिसांत धावही घेतली. मात्र पोलिसांना घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी या दोघांना साडेतीन तास बाहेर बसवून ठेवलं, असं त्यांनी जबाब म्हटले.

'नवा कायदा पुस्तकात पाहून लिहावा लागतो. त्यामुळे वेळ लागतो असे कारण पोलीस देत राहिले. त्याचवेळी पोलीस स्टेशनला पीआय महाजन आणि बनसोडे नावाचे अधिकारी होते. त्यांना सर्व हकीकत सांगितले. मात्र घटनेचा गांभीर्य महाजन यांना माहिती असूनही त्यांनीही काहीही कारवाई केलेली नाही. आरोपींच मोबाईल लोकेशन शोधलं नाही. अपहरण करणारी स्कॉर्पिओ बाजूने गेली. तिथे शोध पोलिसांनी शोध घेतला नाही. सरपंच संतोष देशमुख गंभीर अवस्थेत सापडल्यानंतर याच प्रत्यक्षदर्शीची सही पोलिसांनी मात्र घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोरड्याठाक मराठवाड्यात रोजगारावर संकट, नवरात्रीपूर्वीच शेतमजूरांवर स्थलांतराची वेळ

Rice Manchurian Recipe: उरलेल्या भातापासून घरी बनवा टेस्टी स्पायसी राईस मंचुरियन, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

SCROLL FOR NEXT