Udayanraje bhosale : छत्रपती भडकले! 'सरकार बोळ्यानं दूध पितं का?' उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर

udayanraje bhosale News : कोरटकर, सोलापूरकरसह छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांची यादी मोठी आहे.. त्यामुळे संतापलेल्या उदयनराजेंनी सरकारला घरचा आहेर दिलाय.. नेमकं उदयनराजे काय म्हणाले आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
Udayanraje bhosale News
Udayanraje bhosaleSaam tv
Published On

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केली जातायत..त्याविरोधात कायदा करण्याची मागणी करत भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी सरकार बोळ्यानं दूध पितं का? असा सवाल करत सरकारला घरचा आहेर दिलाय.....त्यानंतर विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय... विजय वडेट्टीवारांनी उदयनराजेंच्या वक्तव्याचा संदर्भ देत सरकारवर हल्लाबोल केलाय...

Udayanraje bhosale News
Shocking News : वंशाच्या दिव्यासाठी बाप झाला हैवान; ५ महिन्यांच्या जुळ्या मुलींना जमिनीवर आपटून ठार मारलं

कायदा करण्याबाबत सरकार बोळ्यानं दूध पितं का? असा सवाल भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. उदयनराजे बोलतात तसं काहीही करु शकतात, असं काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.

Udayanraje bhosale News
Mumbai Accident : मुंबईच्या सेनापती बापट मार्गावर भीषण अपघात; टॅक्सी चालकासह दोघांचा जागीच मृत्यू

हे असं असलं तरी प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं.. त्यावर उदयनराजेंनी संतप्त प्रतिक्रीया दिली होती.. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रीया देत उदयनराजेंचा संताप योग्य असल्याचं म्हटलंय.

Udayanraje bhosale News
Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील मटण, मासे आणि शोरमाची दुकाने बंद करा; शिवसेना नेत्याची मागणी, कारण काय?

भाजपचेच खासदार असलेल्या उदयनराजेंनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करण्यासाठी खडे बोल सुनावलेयेत... त्यामुळे आतातरी सरकारचे डोळे उघडणार का? आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकार कधी कायदा करणार? याकडे लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com