Child Marriage Saam tv
महाराष्ट्र

Child Marriage: धक्कादायक..एकाच मुलीचा तीन वेळा बालविवाह; चाईल्ड लाईनने आणली धक्कादायक माहिती समोर

धक्कादायक..एकाच मुलीचा तीन वेळा बालविवाह; चाईल्ड लाईनने आणली धक्कादायक माहिती समोर

विनोद जिरे

बीड : बालविवाहाचा अतिशय धक्कादायक प्रकार बीडमध्ये पुन्हा एकदा समोर आला. एकाच मुलीचा तीन वेळा बालविवाह (Child Marriage) लावल्याची धक्कादायक माहिती चाईल्ड लाईनने समोर आणली आहे. यात १४ व्या वर्षी पहिला आणि १७ व्या वर्षी तिसऱ्यांदा या मुलीचा बालविवाह लावण्यात आला असून ही धक्कादायक घटना बीडच्या (Shirur) शिरूर तालुक्यामध्ये समोर आली. (Live Marathi News)

बीडच्या (Beed) शिरूर तालुक्यातील बावी येथील ऊसतोड कामगाराच्या १४ वर्षीय मुलीचा २२ डिसेंबर २०२० ला पहिल्यांदा विवाह (Marriage) उखंडा येथील तरूणाशी झाला होता. परंतु मुलगी सासरी नांदलीच नाही अन्‌ अवघ्या १० महिन्यातच मुलगी माहेरी परतली. नंतर या मुलीचा दुसरा बालविवाह १८ फेब्रुवारी २०२२ रोजी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रूई गावातील तरुणाशी लावून देण्यात आला होता. या ठिकाणीही ती मुलगी नांदली नाही.

तिसऱ्या विवाहात प्रकार आला समोर

तर आता तिसरा विवाह मुलीच्या घरी ७ जून २०२३ ला दहीवंडी येथील ३४ वर्षांच्या तरूणाशी झाला. सध्या मुलीचे वय १७ वर्षाचे आहे. ही माहिती चाईल्डच्या हेल्पलाईनवर मिळताच त्यांनी तिथे धाव घेतली. अधिक चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक माहीती समोर येत हे तिन्ही प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान याप्रकरणी बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT