Beed Police End Life Saam Tv
महाराष्ट्र

Beed: बीड हादरले! पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, घरात कुणी नसताना उचललं टोकाचं पाऊल

Beed Police End Life: बीडमध्ये पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. राहत्या घरात त्यांनी गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे बीड पोलिस दलात खळबल उडाली आहे.

Priya More

Summary:

  • बीडमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या

  • राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं

  • आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट

  • पोलिस दलात खळबळ उडाली

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. राहत्या घरी त्याने गळफास घेत आयुष्य संपवलं. बीड शहरातील नगर रोडवर ही घटना घडली. हा पोलिस कर्मचारी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. बाळकृष्ण जायेभाय (वय ४२ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव होते. या घटनेमुळे बीडच्या पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे. त्याच्या आत्महत्येमागचं कारण समोर आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण जायेभाय हे नगर रोडवरील समर्थ मंगल कार्यालयाच्या मागील बाजूल असलेल्या लोकाशा नगरमध्ये कुटुंबीयांसोबत राहत होते. त्यांनी राहत्या घरातच गळफास घेत आयुष्य संपवलं. बाळकृष्ण जायभाय हे सध्या माजलगाव शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या का केली? यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

पोलिस दलामध्ये कर्तव्यदक्ष, मनमिळावू म्हणून आणि सर्वांशी प्रेमाने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून बाळकृष्ण जायभाय ओळखले जात होते. बाळकृष्ण जायभाय यांनी बीड स्थानिक गुन्हे शाखा तसेच गेवराई पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावले होते. यामुळे ते बीड जिल्ह्यात चांगले परिचित होते. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे पोलिस दलात आणि आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या आत्महत्येचा तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापौर अन् उपमहापौर फिल्डवर; अधिकाऱ्यांची झाडाझडती, पाहा VIDEO

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेला दिलासा नाही, 2 मेपर्यंत पोलिस कोठडीत वाढ

Chanakya Niti: या ५ सवयींमुळं लोक घेतात तुमचा गैरफायदा, स्वतःला बदला, अन्यथा...

Bachchu kadu : बच्चू कडूंचा पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार? काय म्हणाले 'प्रहार'चे कार्यकर्ते? VIDEO

Moong Dal Halwa Recipe: सणासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मूग डाळ हलवा

SCROLL FOR NEXT