Beed Breaking News: Saamtv
महाराष्ट्र

Pankaja Munde News: 'तुम्हाला माझी शपथ, जीवाचं बरवाईट करु नका!' पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना विनंती, म्हणाल्या, 'जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो...'

Beed Breaking News: "तुम्हाला हात जोडून विनंती करते. कृपा करुन माझी शपथ आहे तुम्हाला, स्वतःच्या जिवाला काही करुन घेऊ नका," असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.

Gangappa Pujari

बीड, ता. १३ जून २०२४

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. पंकजा मुंडे यांचा हा पराभव त्यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. लोकसभेच्या निकालानंतर मुंडे यांच्या तीन समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यावरुनच पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत कार्यकर्त्यांना टोकाचे पाऊल न उचलण्याची विनंती केली आहे.

काय म्हणाल्यात पंकजा मुंडे?

काल बोलु तुमच्या सर्वांशी मला कळत नाही. मी आवाहन केले. मी केलेलं आवाहन तुमच्या दुःखाच्या, नैराश्येच्या पलिकडे पोहोचत नाही की काय? असे मला वाटते. गेल्या काही दिवसात ज्या तरुणांनी आत्महत्या केल्यात. त्या आत्महत्यांनी मी जेवढी खचले, तेवढं कदाचित कोणी खचलं नसेल. मी अहमदपुरमधील तरुणाच्या आईशी बोलले. ती माऊले म्हणते, ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याचा तुमच्यावर जीव होता.

अरे इतकं प्रेम! ह्याला शब्द मला सापडत नाहीत. प्रत्येक क्षणी एकेक कर्ज माझ्यावर चढवत आहात. गेल्या २०-२२ वर्षात मी पाहिलेलं आहे, मुंडे साहेबांसारख्या पहाडासारख्या नेत्याला भावनिक होताना. मी त्यांना आधार दिला. एवढी मोठी नाही पण आधार देण्याचा भाव वाटला. त्यांना वाटू नये, मला मुलगी आहे, कोमल आहे. नाही बाबा! मी खूप कर्मठ आहे आणि तुमच्यासारखे लढायला मागे पुढे पाहणार नाही.

जेव्हा मुंडे साहेब वारले तेव्हा आठवा तो दिवस. दगड पडत होती तरीही मी धावले. अनेक जीव जातील याचा विचार केला. तेव्हा मी तुम्हाला मुंडे साहेबांची शपथ दिली होती.आता हे झालं ते तुमच्या जिवाला फार लागलेलं आहे. तुम्ही जर असे जिव्हारी लावून घेणार असालं अन् असे रस्त्यावर जाणार असाल. असे पाऊल उचलणार असाल तर राजकारणात पुढचे पाऊल काय उचलायचे? असा माझ्यासमोर प्रश्न आहे. कारण माझ्या राजकारणात स्वार्थ नाही.

मला माहितेय आत्तापर्यंत एखाद्या वर्गाला, वर्णाला हिन लेखून प्रचार झाला नाही. ते तुमच्या मनाला लागलं मला मान्य आहे. मात्र आपल्याला वंचितांचा आवाज बनायचं आहे. असा जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, मगं मी कसं काम करु. तुम्हाला हात जोडून विनंती करते. कृपा करुन माझी शपथ आहे तुम्हाला, स्वतःच्या जिवाला काही करुन घेऊ नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shifting Company Fraud : घराची शिफ्टिंग लय महागात पडली; शिफ्टिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सोन्यावर डल्ला

Maharashtrachi Hasyajatra: 'सगळं फिरलो, पण आपलं गावच बरं! हास्यजत्रेच्या मंचावर ओंकार भोजनेचा कमबॅक

Panhala History: सह्याद्रीच्या वैभवात महाराष्ट्राचे ऐतिहासिक रत्न, पन्हाळा गडाचा इतिहास

Weight Gain: झोपेच्या अभावामुळे वजन वाढते? जाणून घ्या कारण

Shaniwar Wada Namaz Row : भाजप खासदार मेधा कुलकर्णींना अटक होणार? पुण्यातील शनिवारवाडा प्रकरण तापलं

SCROLL FOR NEXT