Heat Stroke Saam tv
महाराष्ट्र

Heat Stroke : उष्माघाताने परळीत भाजी विक्रेत्याचा मृत्यू; बीड जिल्ह्यातही उष्णतेची लाट

Beed News : बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. या दरम्यान गेल्या ३ दिवसात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले

विनोद जिरे

बीड : मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून तापमान ४३ अंशावर पोहोचले आहे. उष्णतेच्या झळा अधिक तीव्र असून वाढलेल्या तापमानामुळे उष्मघाताचा त्रास होऊन एका भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना परळीमध्ये घडली आहे. 

बीड (Beed) जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. या दरम्यान गेल्या ३ दिवसात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. दरम्यान परळी येथे एका भाजीपाला विक्रेत्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. परळी (Parali) येथील बाजारपेठेत महादेव संभाजी गुट्टे हे भाजीपाला विक्री करतात. भर दुपारी देखील ते बाजारात भाजी विक्रीचे काम करत होते. दरम्यान त्यांना अचानक भोवळ आली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

उष्माघात टाळण्यासाठी हे करा 

तापमान वाढीमुळे शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. प्रामुख्याने (Temperature) तीव्र उन्हात काम करताना शरीरातील पाणी कमी होत असते. यामुळे उष्माघात होण्याची शक्यता असते. यामुळे भरपूर पाणी, द्रव्य पदार्थ, फळांचा रस प्यावा. तसेच घट्ट कपडे वापरणं टाळावेत. काळे किंवा गडद रंगाचे कपड्यांऐवजी फिक्या रंगाचे कपडे घालावेत. दुपारी उन्हात बाहेर जाणे शक्यतो टाळा. कुलर किंवा एसीमधून लगेच उन्हात जाणे टाळावे. बाहेर जाताना टोपी किंवा रुमाल डोक्यावर असावा. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

SCROLL FOR NEXT