Tiger Attack : वाघाच्या हल्यात इसमाचा मृत्यू; तेंदूपत्ता संकलनासाठी गेला असतानाची घटना

Wardha News : तेंदुपत्ता तोडण्यासाठी गावातील काही महिला- पुरुषांसोबत लिंगा मांडवी जंगल परिसरात गेले होते. त्यांच्यासोबत काही वन मजूर देखील होते
Tiger Attack
Tiger AttackSaam tv

चेतन व्यास 
वर्धा
: तेंदूपत्ता तोडण्यासाठी लिंगा मांडवी जंगल परिसरात गेलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीवर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना कारंजा तालुक्यातील धावसा हेटी शिवारातील लिंगा मांडवी बीटात घडली. देवराव श्रावण राऊत असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. 

Tiger Attack
Nandurbar Weather: नंदुरबार जिल्ह्यात चक्रीवादळाचा फटका; केळी आणि पपई बागांचे नुकसान

देवराव राऊत हे मागील काही वर्षांपासून धावसा हेटी येथे वास्तव्यास होते. ते तेंदुपत्ता तोडण्यासाठी गावातील काही महिला- पुरुषांसोबत लिंगा मांडवी जंगल परिसरात गेले होते. त्यांच्यासोबत काही वन मजूर देखील होते. (Wardha) दाट जंगलात तेंदुपत्ता तोडत असताना सुरुवातीला त्यांना अस्वल दिसले. पण देवराव याने आरडा-ओरड करून अस्वलीला जंगलात पिटाळून लावले. त्यानंतर देवराव व त्यांच्यासोबत असलेल्या दोन महिला तसेच सहा ते सात पुरुष सहकाऱ्यांनी पुन्हा तेंदुपत्ता गोळा (Tiger Attack) करण्याच्या कामाला सुरवात केली. याचा दरम्यान हि घटना घडली. 

Tiger Attack
Dhule News : चिमुकल्याचा धरणात बुडून मृत्यू; शेळ्या चारण्यासाठी तिघे मित्र गेले होते धरणाच्या काठी

देवराव सोबत असलेल्यांना झुडपातून काहीतरी पळाल्याचा आवाज आला. यामुळे त्यांनी देवरावला आवाज दिला. परंतु प्रतिसाद मिळाला नसल्याने देवराव याचा शोध घेण्यास सुरूवात केली. याच दरम्यान देवरावचा मृतदेह जंगल परिसरात आढळून आला. तर काही अंतरावर झुडपात पट्टेदार वाघ (Tiger) असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी धाडस करून वाघाला जंगलात पळवून लावले. सदर घटनेची माहिती वन्यजीव विभागाच्या (Forest department) अधिकाऱ्यांना देण्यात आली. यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर गजभिये आणि त्यांच्या सहकारी व कारंजा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेत उत्तरिय तपासणीसाठी कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com