Nandurbar Weather: नंदुरबार जिल्ह्यात चक्रीवादळाचा फटका; केळी आणि पपई बागांचे नुकसान

Nandurbar Rain News: राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे शेतात असलेल्या पिकांना मोठा फटका बसत आहे.
Nandurbar Weather Update: नंदुरबार जिल्ह्यात चक्रीवादळाचा फटका; केळी आणि पपई बागांचे नुकसान
Nandurbar Weather News: Banana Crop Got Damaged Due To Cyclone Hits Nandurbar DistrictSaam tv

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. काही भागात जोरदार वाऱ्याचा तडाखा बसत असून नंदुरबार जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांना बसला आहे. तर शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील केळी आणि पपई पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे.  

Nandurbar Weather Update: नंदुरबार जिल्ह्यात चक्रीवादळाचा फटका; केळी आणि पपई बागांचे नुकसान
Unseasonal Rain : अकोल्यात अवकाळीसह गारपीट; केळी पिकांचे मोठे नुकसान

राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे शेतात असलेल्या पिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान (Nandurbar) नंदुरबार व शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे पाहण्यास मिळाले. तर नुकत्याच लागवड केलेल्या पपई पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उन्हापासून कोवळ्या पिकांना संरक्षण मिळावं यासाठी लावण्यात आलेले महागाई क्रॉप कव्हर ही खराब झाल्याने (Farmer) शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Nandurbar Weather Update: नंदुरबार जिल्ह्यात चक्रीवादळाचा फटका; केळी आणि पपई बागांचे नुकसान
Dhule Fire News : धुळ्यात फटाका गोडाऊनला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

गावितांनी केली नुकसानीची पाहणी

वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच तातडीने मदत करण्याचे आश्वासन देखील देण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com