Dhule Fire News: धुळ्यात फटाका गोडाऊनला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

Dhule Maharashtra News: धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या अवधान परिसरातील फटाक्याच्या गोडाऊनला अचानकपणे आग लागल्याची घटना घडली
Dhule Fire News: धुळ्यात फटाका गोडाऊनला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
Dhule Fire News Today: Fire At Firecracker Godown in DhuleSaam tv

धुळे : धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावरील अवधान परिसरात असलेल्या फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. क्षणार्धात आगीने रौद्ररूप घेतले असून आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे बंब दाखल झाले. यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे.

Dhule Fire News: धुळ्यात फटाका गोडाऊनला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
Jalgaon Pune Flight Service : जळगाव- पुणे विमानसेवा होणार सुरू; तिकीट बुकिंग झाली सुरु

धुळे (Dhule) शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या अवधान परिसरातील फटाक्याच्या गोडाऊनला अचानकपणे आग लागल्याची घटना घडली असून, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. आगीची तीव्रता वाढल्यामुळे (Fire Brigade) अग्निशमन विभागाला आग विझवण्यात अडचणी आल्या. मात्र अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास अग्निशमन विभागाचे सहा बंब लागले आहे.

Dhule Fire News: धुळ्यात फटाका गोडाऊनला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
Unseasonal Rain : अकोल्यात अवकाळीसह गारपीट; केळी पिकांचे मोठे नुकसान

सुदैवाने जीवितहानी टळली

फटाका गोडाऊनला लागलेल्या आगीचे (fire) कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. आग लागली यावेळी गोडाऊनमध्ये मजूर अडकल्याची भीती वर्तविली जात होती. मात्र सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली आहे. दरम्यान आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com