Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : ६ लाख घेताना माजलगावचा मुख्याधिकारी ताब्यात; काँक्रीटीकरण रस्त्याचे २ कोटीचे बिल काढण्यासाठी घेतली लाच

Beed Majalgaon News : बिल काढण्यासाठी मुख्याधिकारी चव्हाण याने सहा लाख तसेच उर्वरित कामातील रस्त्याच्या बाजुचे अतिक्रमण काढून अडथळे दूर करुन देण्यासाठी सहा लाख अशा बारा लाख रुपयांच्या लाचेची मागणी

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. या कामाचे २ कोटी रुपयांचे बिल काढण्यासाठी बीडच्या माजलगाव नगरपालिकेचा मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण याने लाचेची मागणी केली. त्यानुसार ६ लाख रुपयांची लाच घेताना चव्हाण यास संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई चव्हाण यांच्या निवासस्थानी करण्यात आली.

बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरामध्ये नगरोत्थान योजनेअंतर्गत विकासकामे सुरु आहेत. यात रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले आहे. दरम्यान काम झाल्याने तक्रारदार कंत्राटदाराने माजलगावमध्ये केलेल्या सिमेंट रस्त्याचे दोन कोटी रुपयांचे बील प्रशासनांकडे सादर केले होते. हे बिल काढण्यासाठी मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण याने सहा लाख तसेच उर्वरित कामातील रस्त्याच्या बाजुचे अतिक्रमण काढून अडथळे दूर करुन देण्यासाठी सहा लाख अशा बारा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. 

दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम देण्यास तक्रारदार तयार नसल्याने याबाबतची तक्रार संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार एसीबीकडून तक्रारीची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर सापळा रचण्यात आला होता. तर गुरुवारी तक्रारदार व पंच यांच्या समक्ष चंद्रकांत चव्हाण याने बारा लाख रुपये लाचेची मागणी केली. यातील सहा लाख रुपये गुरुवारी व उर्वरित सहा लाख शुक्रवारी (दि.11) रोजी देण्याचे ठरले होते. 

६ लाखाची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले 

दरम्यान ठरल्यानुसार तक्रारदार चंद्रकांत चव्हाण याच्या माजलगाव शहरातील पिताजी नगरी भागातील निवासस्थानी तक्रारदार सहा लाख रुपये घेवून गेले. यावेळी एसीबीचे पथकाने सापळा रचलेला होता. त्यावेळी चव्हाण याने सदरची सहा लाख रूपयांची रक्कम  स्विकारताच त्याला लाचेच्या रकमेसह पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT