Crime: नवरा-बायकोचं भांडण, निष्पाप बाळाचा गेला जीव; चुलतीने मारण्यासाठी त्रिशूळ उगारला अन्...

Pune Crime: पुण्यातल्या दौंडमध्ये नवरा-बायकोच्या भांडणामध्ये चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना दौंडच्या कडेगावमध्ये घडली. या प्रकरणी नवरा-बायकोला पोलिसांनी अटक केली.
Crime:  नवरा-बायकोचं भांडण, निष्पाप बाळाचा गेला जीव; चुलतीने मारण्यासाठी त्रिशूळ उगारला अन्...
Pune Crime Saam Tv
Published On

दौंडमध्ये नवरा-बायकोच्या भांडणात निष्पाप बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दीर आणि भावजयीचे भांडण सोडवायला गेलेल्या महिलेच्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भांडण सोडवण्यासाठी गेले असता जावेच्या कडेवर असलेल्या बाळाच्या डोक्यात त्रिशूळ घुसला. यामध्ये बाळाचा तडफडून जागीच मृत्यू झाला. ही महिला नवऱ्याला त्रिशूळ फेकून मारत होती. पण हा त्रिशूळ नवऱ्याला न लागता बाळाच्या डोक्यात घुसला. या घटनेत ११ महिन्याच्या निष्पाप बाळाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील कडेगावच्या आंबेगाव पुनर्वसन भागात ही धक्कादायक घटना घडली. नवरा- बायकोच्या भांडणात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोक्यात त्रिशूळ घुसल्यामुळे ११ महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. अवधूत मेंगवडे असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. नवरा-बायकोचे भांडण सुरू होते. हे भांडण सोडवण्याची भावजयी आपल्या चिमुकल्या मुलाला कडेवर घेऊन गेली. यावेळी महिलेने नवऱ्याच्या दिशेने त्रिशूळ फेकून मारला. हा त्रिशूल चिमुकल्याच्या डोक्यात घुसला. या भांडणात निष्पाप अवधूतचा मृत्यू झाला.

Crime:  नवरा-बायकोचं भांडण, निष्पाप बाळाचा गेला जीव; चुलतीने मारण्यासाठी त्रिशूळ उगारला अन्...
Ambad Crime : बँकेतून २ लाख ३० हजार रुपयांची बॅग लांबविली; अंबडच्या एसबीआय बँकेतील घटना

नवरा- बायकोच्या भांडणात निष्पाप मुलाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडेगावमध्ये राहणाऱ्या मेंगवडे कुटुंबामध्ये भांडण झाले. नवरा-बायकोचे टोकाचे भांडण सुरू होते. या भांडणात बायकोने नवऱ्याला मारण्यासाठी त्रिशूळ फेकून मारला. हा त्रिशूल डोक्यात घुसून चिमुकल्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यामध्ये नवरा-बायकोच्या विरोधात सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यवत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Crime:  नवरा-बायकोचं भांडण, निष्पाप बाळाचा गेला जीव; चुलतीने मारण्यासाठी त्रिशूळ उगारला अन्...
Jalgaon Crime News : दारू देण्यास नकार, तरुणांची सटकली; हॉटेल मालकावर अंदाधुंद गोळीबार, जळगावमध्ये खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com