Nalasopara Crime News
Nalasopara Crime News Saam Tv News

माझी बायको घर सोडून गेली, मी जिवंत राहणार नाही; पाण्याच्या टाकीवर चढून नवऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Nalasopara Crime News : पत्नीने घर सोडल्याच्या रागाने तरुणाने थेट ‘शोले’ चित्रपटातील वीरूप्रमाणे नालासोपाराच्या अचोले येथील पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
Published on

विरार : पत्नीने घर सोडल्याच्या रागाने तरुणाने थेट ‘शोले’ चित्रपटातील वीरूप्रमाणे नालासोपाराच्या अचोले येथील पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, अचोले पोलिसांच्या आणि पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत त्याला सुखरूप खाली उतरवलं. सुरज सैनिक असं या तरुणाचं नाव आहे. तो पाण्याच्या बाटल्या विकण्याचं काम करतो. मागील दोन महिन्यांपासून तो दारूच्या नशेत त्याच्या पत्नीला वारंवार मारहाण करत होता. त्या मारहाणीला कंटाळून त्याच्या पत्नीनं त्याला सोडलं होतं. अशी माहिती आचोले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार यांनी दिली आहे.

मीरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तपदी निकेत कौशिक यांची नियुक्ती

मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयात मोठा बदल करण्यात आला आहे. सध्याचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली झाली असून त्यांची नियुक्ती अप्पर पोलीस महासंचालक पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता वरिष्ठ पोलीस अधिकारी निकेत कौशिक हे मीरा भाईंदर वसई विरार शहराचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

Nalasopara Crime News
Shahapur News : टॉयलेटमध्ये रक्त आढळलं, विद्यार्थिनींची विवस्त्र करून तपासणी केली; शहापूरच्या इंग्लिश मीडियम शाळेतील प्रकार

मधुकर पांडे यांनी मीरा-भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असताना गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच पोलीस प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या कार्यकाळात अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. आता त्यांच्या जागी निकेत कौशिक हे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. निकेत कौशिक हे याआधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते.

Nalasopara Crime News
बेळगावात मराठी कुटुंबानं उचललं टोकाचं पाऊल; विष प्राशन करून तिघांनी आयुष्य संपवलं, एकीची प्रकृती गंभीर | Belgaum

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com