Chandu Chavhan : बडतर्फ चंदू चव्हाण देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात; बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Dhule news : पाकिस्तानच्या ताब्यात तीन महिने २१ दिवस राहिल्यानंतर भारत सरकारने केलेल्या प्रयत्नानंतर पुन्हा मायदेशी परतले होते. यानंतर मात्र चंदू चव्हाण यांना सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आले होते
Chandu Chavhan
Chandu ChavhanSaam tv
Published On

धुळे : भारतीय सैन्याबाबत खोटी व बदनामी करणारा एक व्हिडीओ बडतर्फ सैनिक चंदू चव्हाण यांनी सोशल मीडियावर प्रसारित केला होता. या प्रकरणी चंदू चव्हाण यांना नाशिक येथील देवळाली कॅम्प पोलीसांनी धुळे येथून ताब्यात घेतले आहे. तसेच देवळाली पोलीस स्टेशनात चंदू चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथील चंदू बाबुलाल चव्हाण हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. भारत- पाकिस्तान सीमेवर तैनात असताना भारताची सीमा क्रॉस करत पाकिस्तानात प्रवेश केला होता. त्यानंतर चंदू चव्हाण याना पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. तीन महिने २१ दिवस पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर भारत सरकारने केलेल्या प्रयत्नानंतर पुन्हा मायदेशी परतले होते. यानंतर मात्र चंदू चव्हाण यांना सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आले होते. 

Chandu Chavhan
Virar Crime : लघूशंकेला गेले असता बाळाचा आवाज, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बघताच पायाखालची जमीन सरकली

पोलिसांनी घेतले ताब्यात 

दरम्यान चंदू चव्हाण यांनी भारतीय सैन्याबाबत खोटी व बदनामीकारक व्हिडिओ पोस्ट केल्या आहेत. तसेच बडतर्फ सैनिकांना सैन्याचा गणवेश बंदी असतांना देखील सैन्याचा गणवेश घालून फिरणे यासह इतर बाबींमुळे देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनात येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर धुळे येथून आज चंदू चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. 

Chandu Chavhan
नक्षलवाद अन् माओवाद्यांना लगाम बसणार, राज्य जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर; जनसुरक्षा कायदा म्हणजे काय?

पालिका कर्मचाऱ्यांकडून मारहाण 

मागील काही दिवसांपासून चंदू चव्हाण यांनी पालिका कर्मचाऱ्यांकडे गटार साफ करण्याची मागणी केली आहे. अशात काल ते पुन्हा पालिकेत आपली कैफियत मांडण्यासाठी गेले असता महापालिका येथे आंदोलना दरम्यान चंदू चव्हाण यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप चंदू चव्हाण यांनी केला आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यानंतर नासिक पोलिसांनी चंदू चव्हाण याला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com