Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : तांत्रिक विद्येतून पाडतो पैशाचा पाऊस; ४५ लाखांचा घातला गंडा, बीडमधील धक्कादायक प्रकार

Beed News : मांत्रिकांनी शेख अझहर याच्याकडून रोख २४ लाख व फोन पे द्वारे २१ लाख २३ हजार ३१५ रुपये उकळले. मात्र ही रक्कम घेऊन मांत्रिक पसार

विनोद जिरे

बीड :  बीड शहरातून अंधश्रद्धाविषयी पुन्हा एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. तांत्रिक विद्या अवगत करून पैशांचा पाऊस पाडतो, आम्ही तुला मालामाल करतो, असे म्हणत बीड शहरातील एका लॅब टेक्निशीयनला तब्बल ४५ लाख २३ हजार ३१५ रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड (Beed) शहरातील शेख अझहर शेख जाफर असे सदरच्या प्रकारात फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेख अझहर शेख जाफर यांना पैशाचा पाऊस पाडून तुला मालामाल करतो; असे आमिष हमीद खान ऊर्फ बाबू करीम खान व इतरांनी दिले. यासाठी मांत्रिकांनी शेख अझहर याच्याकडून रोख २४ लाख व फोन पे द्वारे २१ लाख २३ हजार ३१५ रुपये उकळले. मात्र ही रक्कम घेऊन मांत्रिक पसार झाले.  

६ जणांवर गुन्हा दाखल 

सदर प्रकारात आपली फसवणूक (fraud) झाल्याचे शेख अझहर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी हमीद खान ऊर्फ बाबू करीम खान (रा. बीड), जिलानी अब्दुल कादर सय्यद (रा. औसा जि. लातूर), सविता पवार (रा. पुंडलिक नगर संभाजीनगर), शेख समीर शेख अहमद (रा. जालना), उत्तम भागवत (रा. घोलपवाडी ता. इंदापूर जि. पुणे) आणि प्रकाश गोरे (रा. झारकरवाडी ता. इंदापूर जि. पुणे) या ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT