Beed Teacher News  Saam Tv
महाराष्ट्र

Beed News : दुसरा धनंजय नागरगोजे होऊ द्यायचा नसेल तर... बीडमधील शिक्षकांचा आक्रोश, थेट सरकारलाच दिला इशारा

Beed Teacher News : बीडच्या एका आश्रमशाळेतील शिक्षकाच्या आत्महत्येने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या शिक्षकाला तब्बल १८ वर्ष पगार देण्यात आला नव्हता. शिक्षकाच्या सहकाऱ्याने या प्रकरणावरुन संताप व्यक्त केला आहे.

Yash Shirke

Beed : बीड येथील शाहू फुले आंबेडकर आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत आत्महत्या केली. नागरगोजे हे १८ वर्ष बिन-पगारी काम करत होते. त्यांच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट निर्माण झाली. दरम्यान पुन्हा धनंजय नागरगोजे होऊ द्यायचा नसेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा असे म्हणत धनंजय नागरगोजे यांच्या सहकारी शिक्षकांनी आवाज उठवला आहे.

धनंजय नागरगोजे ज्या संस्थेमध्ये कार्यरत होते, तेथे काम करणाऱ्या अन्य शिक्षकांनी रोष व्यक्त केला आहे. त्यांच्या आत्महत्या प्रकरणातील दोषी लोकांवर कारवाई करण्यासाठी विनाअनुदानित शिक्षत आक्रमक झाले आहेत. धनजंय नागरगोजे यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी. त्याशिवाय त्यांच्या पत्नीला नोकरीमध्ये समाविष्ट करावे अशी मागणी सहकारी शिक्षकांकडून केली जात आहे.

'१८ वर्ष काम करुन घरी फुटकी कवडी देखील दिली नाही. लेकरा-बाळांना आम्ही काय उत्तर द्यायचं' असे म्हणत सहकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शाहू फुले आंबेडकर निवासी अनुसूचित आश्रम शाळेला व्हि जे एन टीच्या धर्तीवर शंभर टक्के अनुदान देण्यात यावे अशी मागणी संतप्त शिक्षकांनी केली आहे.

शिक्षकांच्या वतीने २५ मार्च रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही उठणार नाही, आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये, असे शिक्षकांनी म्हटले आहे. दरम्यान धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणास सरकार आणि संस्थाचालक जबाबदार असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Baaghi 4 Cast Fees : टायगर श्रॉफ ते श्रेयस तळपदे, 'बागी 4'साठी कोणी किती घेतलं मानधन?

SCROLL FOR NEXT