अनिल परब तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे ५६ पायाला बांधून फिरते; चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार

Chitra Wagh on Anil Parab : महायुतीमधील मंत्री संजय राठोड, जयकुमार गोरे यांच्या केसबाबत कोणी बोलत नाही, त्यांचा राजीनामा घ्या, विरोधीपक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसंही दाबू नका, असं म्हणत अनिल परब यांनी सरकारला टारगेट केलं.
Maharashtra Legislative Council BJP leader Chitra Wagh on Anil Parab
Maharashtra Legislative Council BJP leader Chitra Wagh on Anil ParabSaam TV News
Published On

मुंबई : दिशा सालियान प्रकरणावरुन आज सभागृहात चांगलाच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून दिशा सालियान प्रकरणावर जोरदार खडाजंगी सुरू आहे. सत्ताधाऱ्यांकडून नाव न घेता थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंना लक्ष केलं जात असून विरोधी पक्षातील आमदार ठाकरेंच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब यांनी याप्रकरणी विधानपरिषदेत बोलताना मंत्री संजय राठोड यांचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी, त्यांनी आमदार चित्रा वाघ यांचं नाव घेतल्याने चित्रा वाघ चांगल्याच संतापल्याचं पाहायला मिळालं.

महायुतीमधील मंत्री संजय राठोड, जयकुमार गोरे यांच्या केसबाबत कोणी बोलत नाही, त्यांचा राजीनामा घ्या, विरोधीपक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसंही दाबू नका, असं म्हणत अनिल परब यांनी सरकारला टारगेट केलं. तसेच, चित्रा वाघ यांच्यावरही निशाणा साधला. त्यानंतर, चित्रा वाघ यांचा रुद्रावतार पाहायला मिळालं. मी ५६ परब पायाला बांधून फिरते, असं त्या म्हटल्या.

Maharashtra Legislative Council BJP leader Chitra Wagh on Anil Parab
Pune Crime : थेऊर हत्या प्रकरण; मुख्य आरोपीला अप्रत्यक्षरित्या मदत, पुण्यातील PSI निलंबित

संजय राठोड का मंत्रिमंडळात आहेत त्याचे उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंना विचारा, संजय राठोड यांना का क्लिनचिट दिली, असेल हिंमत तर विचारा त्यांना, अशा शब्दात आमदार चित्रा वाघ यांनी सभागृहात शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांच्यावर पलटवार केला. तसेच, माझं नाव घेऊन बोलण्यात आलं त्यामुळे मी अनिल परब यांना उत्तर देत आहे. तुम्ही असाल पोपट पंडित, माझ्या कुटुंबाने दोन वर्ष जे सहन केलं, तुमच्यासारखे ५६ परब पायाला बांधून फिरते, आम्ही वशिल्याने इथं आलेलो नाही आहोत, असं म्हणत चित्रा वाघ यांनी सभागृहात अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Maharashtra Legislative Council BJP leader Chitra Wagh on Anil Parab
Disha Salian Death Case : आदित्य-रियामध्ये ४४ वेळा फोन कॉल? माजी खासदाराच्या दाव्यानंतर याचिकेतही उल्लेख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com