Beed Farmer Protest Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: पीएम किसान योजनेचा लाभ मिळेना; शेकडो शेतकरी आक्रमक, कृषी अधिकारी कार्यालयात मांडला ठिय्या

Beed Farmer Protest: पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. बीड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे.

Rohini Gudaghe

Farmer Protest In Beed

सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यातीलच एक पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM Kisan Yojana) आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रूपये अनुदान देण्यात येतं. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. बीड तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसल्याचं समोर आलं आहे.  (latest marathi news)

पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे बीड तालुक्यातील अनेक शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे बीड तालुक्यातील शेकडो शेतकरी तालुका कृषी अधिकारी अधिकारी कार्यालयात धडकले (Farmer Protest) आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बीड तालुक्यात शेतकरी आक्रमक

या ठिकाणी लँड सिडिंग नसणे, ई केवायसी नसणे, डीबीटी अनेबल यासह अनेक समस्या पंतप्रधान किसन सन्मान योजनेत येत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वारंवार फेऱ्या मारून देखील दुरुस्ती होत नाही. त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना करून निधी खात्यात वर्ग करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली (Farmer Protest In Beed) आहे.

यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी आपले अर्ज वरिष्ठ कार्यालयात पाठवून त्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचं देखील सांगितलं. परंतु शेतकऱ्यांनी या समस्येवर तात्काळ मार्ग काढण्यास सांगितलं (Beed News) आहे. मार्ग न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी आंदोलकांनी दिला आहे.

शेतकऱ्यांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न

कार्यालयात चकरा मारून शेतकरी वैतागले आहेत. दर महिन्याला येतो आणि अर्ज देतो हे नेहमीचं झालं आहे, परंतु या समस्येवर तोडगा काही निघत नाही. पीकविमा देखील थकलेला (Beed Farmer Protest) आहे, अशी तक्रार देखील शेतकरी आंदोलकांनी केली आहे.

पीएम किसान योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे केवायसी झालेले नाही, अनेकांच्या बॅंक खात्यांची समस्या असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं (PM Kisan Yojana Benefits) आहे. शेतकऱ्यांची समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं आहे. एकही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही. परंतु, त्यासाठी शेतकऱ्यांनीही सहकार्य करावं, असं त्यांनी आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

Voter ID जवळ नाही, टेन्शन सोडा, तरीही मतदान करता येणार, ही १२ कागदपत्रेही आहेत ग्राह्य

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

SCROLL FOR NEXT