SSC Exam Saam tv
महाराष्ट्र

SSC Exam : पेपर सुरु होण्यापूर्वीच इंग्रजीची प्रश्नपत्रिकाच पळवली; धारूर केंद्रावरील प्रकरणात दोघेजण ताब्यात

Beed News : राज्य माध्यमिक मंडळाकडून दहावीचे पेपर सुरु आहेत. यंदाच्या वर्षात कॉपीमुक्त अभियान राबवत प्रत्येक केंदावर बंदोबस्त, व्हिडीओ रेकॉर्डिंग यासह ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचे ठरविण्यात आले होते

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: राज्य माध्यमिक शैक्षणिक मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे. यंदाच्या परीक्षेत कॉपी चालण्यासोबतच पेपर फुटीचा प्रकार देखील घडला आहे. तर बीडच्या धारूर येथील एका जिल्हा परिषद शाळेच्या दहावी परीक्षा केंद्रावरून इंग्रजीचा पेपर सुरू होण्यापूर्वीच दोघाजणांनी प्रश्नपत्रिका घेऊन पलायन केले. पोलिसांनी अर्ध्या तासात पेपरसह दोघांना पकडून त्यांच्या विरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

राज्य माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणार बारावीची परीक्षा नुकताच संपली आहे. तर दहावीचे पेपर अद्याप सुरु आहेत. यंदाच्या वर्षात कॉपीमुक्त अभियान राबवत प्रत्येक केंदावर बंदोबस्त, व्हिडीओ रेकॉर्डिंग यासह ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र या सर्वांचा बोजवारा उडाल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यात इंग्रजीचा पेपर व्हाट्सअँपवर व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला. तर बीड जिल्ह्यात थेट प्रश्नपत्रिकाच पळविल्याचा प्रकार घडला आहे. 

मास्क घेऊन दोघांचा प्रवेश   
शनिवारी दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. याच दरम्यान बीड जिल्ह्यातील धारूर जिल्हा परिषद शाळेतील परीक्षा केंद्रावर चेहऱ्यावर मास्क लावून दोन जणांनी प्रवेश केला. यानंतर त्या दोघांनी प्रश्नपत्रिका पळवली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परीक्षा केंद्रावर खळबळ उडाली होती. तर पालकांमध्ये देखील काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. 

पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात 

दरम्यान या प्रकाराबाबत शिक्षण विभागाने लागलीच चौकशी करत याप्रकरणी शिक्षण विभागाने परीक्षा मंडळाला अहवाल पाठवला आहे. तसेच या प्रकारणा विरोधात धारूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला आहे. तसेच पोलिसांकडून देखिल याची चौकशी करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडणार? महत्त्वाचं कारण आले समोर, वाचा सविस्तर...

Yuzvendra Chahal: ३ तरूणींमध्ये फसला चहल! व्हायरल फोटोवर कमेंट करत म्हणाला, २-३ अजून राहिल्यात...!

Valentine Special Cake : व्हॅलेंटाइन स्पेशल घरच्या घरी बनवा टेस्टी आणि झटपट कॉफी केक, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: पार्थ पवार हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी दाखल

Parth Pawar : मोठी बातमी! पार्थ पवार अचानक शरद पवार-सुप्रिया सुळेंच्या भेटीला, नेमकी चर्चा काय ?

SCROLL FOR NEXT