Tur Price : शेतकरी संकटात; तुरीच्या दरात तीन हजारांची घसरण, हरभऱ्यांचे दर ४०० रुपयांनी खाली

Dharashiv News : शेतकऱ्यांची तूर बाजारात येताच दरात तब्बल तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. नोव्हेंबर महिन्यात तुरीला तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत बाजार भाव मिळत होता
Tur Price
Tur PriceSaam tv
Published On

बालाजी सुरवसे/ संजय राठोड 
धाराशिव/ यवतमाळ
: रब्बी हंगामातील हरभरा व तूर काढणी झाल्यानंतर मार्केटमध्ये विक्रीसाठी आणली जात आहे. मात्र शेतकऱ्याच्या घरात माल आल्यानंतर दरात घसरण होत असल्याचे पुन्हा एकदा पाहण्यास मिळत आहे. सध्या तुरीची आवक वाढली असून दरात तब्बल तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर हरभऱ्याचे दर देखील चारशे रुपयांनी खाली आले आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. 

शेतकऱ्यांची तूर बाजारात येताच दरात तब्बल तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. नोव्हेंबर महिन्यात तुरीला तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत बाजार भाव मिळत होता. परंतु बाजारात तुरीची आवक वाढताच शेतकऱ्यांना सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल दराने तूर विक्री करावी लागत आहे. पावसाच्या तावडीतून शेतकऱ्यांनी हे पीक कसबसं वाचवलं होतं. मात्र दर घसरल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

Tur Price
Nanded : माता नव्हे वैरीण! एक दिवसाच्या अर्भकाला टाकून आई फरार, शेतकऱ्याला रडण्याचा आवाज आला अन्...

हरभऱ्याची आवक वाढतात दर घसरले
यवतमाळ जिल्ह्यातील बाजारात रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक सध्या वाढली आहे. यामुळे दर हमीभावापेक्षा कमी मिळत आहेत. हरभऱ्याचा यावर्षीचा हमीभाव पाच हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल असला तरी जिल्ह्यातील अनेक खाजगी बाजारपेठेत सरासरी पाच हजार २५० रूपये असा भाव मिळत आहेत. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शासकीय खरेदीची आशा नसून पडत्या दरात शेतकऱ्यांना हरभऱ्याची विक्री करावी लागत आहे.

Tur Price
SSC Exam : भंडाऱ्यात दहावीचा पेपर व्हाट्सअपवर केला व्हायरल; सहाय्यक शिक्षकासह मुख्याध्यापकाला अटक

तिवसा येथे शासकीय तूर खरेदीचा शुभारंभ
अमरावती
: अमरावती जिल्ह्यातील तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड मार्फत शासकीय तुर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत तूर खरेदीला सुरुवात करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात नाफेडची २० केंद्रावर तूर खरेदी केंद्र आहे. अमरावती जिल्ह्यात शासनाचे वतीने ३९ हजार ६९४ टन तूर खरेदी होणार असून नाफेडचे तुरीचे शासकीय भाव ७ हजार ५५० रुपये आहे. तुर खरेदीला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com