Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Water Crisis : तीन पाणी योजना राबवूनही ग्रामस्थ तहानलेले; अंजनडोह गावकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

Beed News : अंजनडोह येथे आजपर्यंत तीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. तरी देखील उन्हाळ्याच्या प्रारंभीच या ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: राज्यातील अनेक भागात उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. यामुळे गावकर्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान गावात तीन पाणी पुरवठा योजना राबविल्यानंतर देखील ग्रामस्थ तहानलेले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यातील अंजनहोड येथील संतप्त ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला. 

राज्यातील काही भागात चांगला पाऊस होऊन देखील मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर बीड जिल्ह्यात देखील बऱ्यापैकी पाऊस झाला होता. मात्र पाणी टंचाई हि जाणवू लागली आहे. बीड जिल्ह्यातील अंजनहोड गावात हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायती मार्फत केला जाणारा पाणी पुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. 

गावात तीन पाणी योजना 

बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील अंजनडोह येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महिलांसह मुले देखील सहभागी झाले होते. गंभीर बाब म्हणजे अंजनडोह येथे आजपर्यंत तीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. तरी देखील उन्हाळ्याच्या प्रारंभीच या ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आहे. पुढे तीव्र उन्हाळा सहन करावा लागणार असल्याने पाणी टंचाईची समस्या अधिक बिकट असेल. 

दीड कोटी रुपयांचा निधीही वाया 

तसेच नुकतीच या ठिकाणी जलजीवन अंतर्गत दीड कोटी रुपये निधीची योजना मंजूर झाली होती. परंतु पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे या योजनेतून देखील गावाला पाणी मिळालेले नाही. या सर्व प्रकाराची चौकशी करावी व गावाला तात्काळ पाणीपुरवठा सुरू होईल. यासाठी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामस्थांनी हंडा मोर्चा काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT