Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिल्या सुनावणीची तारीख ठरली; केज न्यायालयातच होणार सुनावणी

Beed News : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. ९ डिसेंबर २०२४ ला संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh CaseSaam tv
Published On

योगेश काशीद 

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण राज्यभरात गाजत आहे. या प्रकरणा संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. सदर प्रकरणाची पहिली सुनावणीची तारीख निश्चित झाली असून बीड जिल्ह्यातील केज न्यायालयात हि सुनावणी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीकडे राज्यभराचे लक्ष लागून आहे.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. ९ डिसेंबर २०२४ ला संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. मागील तीन महिन्यांपासून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात गाजत असून याची अद्याप चौकशी सुरु आहे. यात एसआयटी देखील नियुक्त करण्यात आली आहे.

Santosh Deshmukh Case
Jal Jeevan Mission : जलजीवन मिशनची कामे अपूर्ण; सरपंच उतरले आंदोलनात, पुष्पा स्टाईल आंदोलनाने वेधले लक्ष

केज न्यायालयातच पहिली सुनावणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र या प्रकरणाचा पूर्ण तपास करण्यासाठी आता सदर प्रकरण न्यायालयात गेले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने देशमुख हत्या प्रकरणातील खटला हा बीडच्या न्यायालयात चालवण्याची विनंती एसआयटी कडून करण्यात आलेली आहे. मात्र येत्या १२ मार्च रोजी होत असलेली पहिली सुनावणी ही केज न्यायालयातच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. 

Santosh Deshmukh Case
Latur Bogus school : लातूरमधील बोगस शाळेला २० लाख रुपयांचा दंड; शिक्षण विभागाची मोठी कारवाई

पुढची सुनावणी होणार जिल्हा सत्र न्यायालयात 

दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खटला केज न्यायालया ऐवजी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात चालवला जावा. असा विनंती अर्ज एसआयटीने न्यायालयात सादर केला होता. एसआयटीने सादर केलेल्या या अर्जावर आज सुनावणी झाली असून त्यानुसार देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ मार्चला बीड जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com