Latur Bogus school : लातूरमधील बोगस शाळेला २० लाख रुपयांचा दंड; शिक्षण विभागाची मोठी कारवाई

Latur News : लातूरमधील बोगस शाळा सुरु असल्याबाबतची बातमी साम टीव्हीने प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेत शिक्षण विभागाने बोगस शाळेवर कारवाई करत शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत
Latur Bogus school
Latur Bogus schoolSaam tv
Published On

संदीप भोसले 
लातूर
: शासनाची परवानगी न घेता राजरोसपणे बोगस शाळा चालविल्या जातात. लातूरमध्ये अशाच प्रकारे सुरु असलेल्या बोगस शाळेला तब्बल २० लाख रुपयांचा दंड ठोठावर शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत राजरोसपणे शाळा अजूनही सुरूच असल्याचे पाहण्यास मिळत आहे. अर्थात शाळा प्रशासन शिक्षण विभागाचे आदेश डावलत असल्याचे समोर आले आहे.

लातूरमधील बोगस शाळा सुरु असल्याबाबतची बातमी साम टीव्हीने प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेत शिक्षण विभागाने बोगस शाळेवर कारवाई करत शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच साम टीव्हीच्या बातमीचा दाखला देत विधान परिषदेमध्ये डॉ. प्रज्ञा सातव यांनी बोगस शाळेचा मुद्दा उपस्थित केला होता. राज्यातल्या २५० अनधिकृत बोगस शाळेंवरती कारवाईचा केली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात दिली आहे. 

Latur Bogus school
Champions Trophy Victory : भारताच्या विजयानंतर जल्लोष; अमरावतीत पोलिसांच्या अंगावर फटाके फोडले, तरुणाला दिला चोप

लातूरमध्ये वर्षभरापासून शाळा सुरु 

दुसरीकडे शासनाची कुठलीही मान्यता नसलेली लातूर शहरातील नारायणा ई- टेक्नो स्कूल ही बोगस शाळा मागच्या एक वर्षापासून अनाधिकृतपणे सुरू आहे. या बाबत साम टीव्हीने बातमी प्रसारित केली होती. या बातमीनंतर या शाळेला शिक्षण विभागाने तब्बल वीस लाखाचा दंड लावत शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील अद्याप शाळा बंद करण्यात आलेली नाही. 

Latur Bogus school
Jal Jeevan Mission : जलजीवन मिशनची कामे अपूर्ण; सरपंच उतरले आंदोलनात, पुष्पा स्टाईल आंदोलनाने वेधले लक्ष

६०० विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला 

दरम्यान या बोगस शाळेत जवळपास ६०० विद्यार्थ्यांचे भवितव्य आता धोक्यात आलं आहे. शासनाची परवानगी न घेता शाळा सुरु करण्यात आली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शिक्षण विभागाच्या आदेशाला शाळा प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. आता शिक्षण विभागाकडून कोणते पाऊल उचलले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com