Beed Crime News Saam TV
महाराष्ट्र

Beed News: आधी श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवला अन् उचलले टोकाचे पाऊल; २० वर्षीय तरुणाच्या मृत्यूने खळबळ

Beed Latest News: याप्रकरणी बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मित नोंद करण्यात आली आहे.

विनोद जिरे

Beed Crime News: बीड जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये एका २० वर्षीय तरुणाने श्रध्दांजलीचे स्टेटस ठेवत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड (Beed) जिल्ह्यातील आत्महत्येचं ग्रहण सुटायचे नाव घेत नाही. अशीच एक धक्कादायक घटना बीडच्या अंधापुरीघाट गावातून समोर आली आहे. अंधापुरीघाट गावात एका 20 वर्षीय तरुणाने स्वतःच्या मोबाईलवर श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून गळफास घेऊन आत्महत्या केली. शुभम बाळासाहेब जगताप वय 20 असे त्या तरुणाचे नाव आहे.

या घटनेची माहिती कळताच नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सदरील घटनेचा पंचनामा नेकनूर पोलिसांनी केला असून शुभम जगताप याने नेमकी आत्महत्या का केली? हे अद्याप समोर आले नाही. याप्रकरणी बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मित नोंद करण्यात आली आहे.

परभणीत २० वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य...

दरम्यान, परभणीमधूनही अशीच एक दुर्देवी घटना समोर आली आहे. अभियंता होण्याच स्वप्न भंग झाल्याने वीस वर्षीय तरुणीने आयुष्य संपवल्याची दुर्देवी घटना परभणीमध्ये घडली आहे. सीईटी परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तरुणीने रेल्वेखाली उडी मारत आत्महत्या केली. श्रुती शिवाजी मुजमुले (वय 20) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याची हत्या, लोहगडावर फिरायला नेऊन केतन अग्रवालचा घात

Maharashtra Politics: ऑपरेशन टायगरनंतर 'ऑपरेशन बीएमसी' खासदारांनंतर आता नगरसेवकही फुटणार?

Maharashtra News Live Update: पुण्यात गुजरातमधून विक्रीसाठी आणलेला गुटखा जप्त

तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! नागपूरात बनावट डॉक्टरचा पर्दाफाश, पुण्यात नकली स्किनकेअरचा धक्कादायक प्रकार

शिंदेसेनेच्या नेत्याकडून बाळासाहेबांची खिल्ली, पावसकरांच्या लेखी शिवसेना पाळणाघर

SCROLL FOR NEXT