Beed Zp Saam tv
महाराष्ट्र

Beed Zp School : बीड जिल्हा परिषदेच्या ९८ शाळांना इमारतच नाही; शेडमध्ये अथवा झाडाखाली भरविली जाते शाळा

Beed News : बीड जिल्हा परिषदेच्या एकूण २ हजार ४०० शाळा आहेत. यापैकी ९८ शाळांना इमारतच उपलब्ध नाही

विनोद जिरे

बीड : जिल्हा परिषद शाळांची अवस्था वाईट असल्यामुळे या शाळांमध्ये पालक आपल्या मुलांना पाठविण्यास तयार होत नाहीत. यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असते. असे असताना देखील बीड जिल्ह्यातील तब्बल ९८ शाळांना इमारतच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. परिणामी या शाळांमधील विद्यार्थ्यांना झाडाखाली किंवा तात्पुरत्या बनविलेल्या पत्री शेडमध्ये बसून शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत. 

बीड (Beed) जिल्हा परिषदेच्या एकूण २ हजार ४०० शाळा आहेत. यापैकी ९८ शाळांना इमारतच उपलब्ध नाही. यामुळे या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना तात्पुरत्या शेडमध्ये अथवा झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती असून केवळ कागदोपत्री याबाबतचा पाठपुरावा झाल्याची प्रतिक्रिया अधिकारी देतात. तर अनेक ठिकाणच्या इमारती या मोडकळीस आल्या असून त्या ठिकाणी देखील (Zp school) नव्या इमारती उभारणे गरजेचे आहे. परंतु याबाबत पाहिजे त्या गतीने पाठपुरावा होत नसल्याचे दिसत आहे.

डोंगरकिन्ही येथे जुन्या ठिकाणीच भरते शाळा
पाटोदा तालुक्यातील डोंगरकिनी येथे शाळेसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु केवळ एक कोटीचाच निधी मिळाला असून त्यातून झालेल्या वर्ग खोल्या या अपुऱ्या ठरत आहेत. यामुळे जुन्याच इमारतीत शाळा भरवण्याची वेळ येथील शिक्षकांवर आली आहे. उर्वरित निधी मंजूर करावा यासाठी  प्रयत्न केले, परंतु अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने नवी इमारत देखील धुळखात पडून आहे.

अशी आहे स्थिती 

बीड तालुक्यातील २८, केज तालुक्यातील १७, परळी तालुक्यातील १२, माजलगाव तालुक्यातील ११, गेवराई तालुक्यातील ११, अंबाजोगाई तालुक्यातील ६, शिरूर तालुक्यातील ५, पाटोदा तालुक्यातील ३,  धारूर तालुक्यातील ३, आष्टी आणि वडवणी तालुक्यातील प्रत्येकी १ अशा एकूण ९८ जिल्हा परिषद शाळा या इमारतीविना आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT