Mokarpanti WhatsApp Group Video Viral  Saam Tv News
महाराष्ट्र

Beed Crime : 'मोकारपंती' नावाच्या ग्रुपला 'तो' व्हिडिओ टाकला, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकला फटका बसला

Beed Santosh Deshmukh Murder Case : सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे, संतोष देशमुख यांचे कपडे काढल्यानंतर कशाप्रकारे त्याना वागणूक दिली हे सुद्धा या फोटोच्या स्वरूपातून पाहायला मिळत आहे.

Prashant Patil

बीड : दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी माहिती आता समोर आली आहे. व्हाट्सअॅप कॉलचा व्हिडिओच एक महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. संतोष देशमुख यांना अपहरण झाल्यानंतर मारहाण करतानाचा व्हिडिओ कृष्णा आंधळेने एका व्हाट्सअॅप ग्रुपवर शेअर केला होता आणि हाच व्हिडीओ या हत्या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा ठरला आहे.

'मोकारपंती' असं या ग्रुपचं नाव असून यामध्ये पाच ते सहा जणांनी संतोष देशमुख यांना कसं मारहाण होतेय ते पाहिलं होतं. फॉरेन्सिककडून हा व्हिडिओ सीआयडीला मिळाल्यानंतर त्याचे छोटे छोटे १० ते १२ व्हिडिओ तयार झाले आणि त्यातूनच या व्हिडीओमधील व्यक्ती आणि सीआयडीने या प्रकरणात ताब्यात घेतलेली व्यक्ती यांची फॉरेन्सिक तपासणी झाली. या व्हिडिओतील काही फोटो हे या आरोप पत्रात जोडण्यात आले आहेत . ज्यामध्ये सुदर्शन घुले हा कशा प्रकारे संतोष देशमुख यांना मारहाण करतोय हे दिसतंय.

सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे, संतोष देशमुख यांचे कपडे काढल्यानंतर कशाप्रकारे त्याना वागणूक दिली हे सुद्धा या फोटोच्या स्वरूपातून पाहायला मिळत आहे. व्हिडीओ बनवत असतानाच सुदर्शन घुले त्यानंतर सुधीर सांगळे आणि प्रतीक घुले हे हसत हसत मारहाण करताना व्हिडीओमध्ये कैद झाले आहे. त्यांच्या डोळ्यांमध्ये पश्चाताप सुद्धा नाही, असा दोषारोपत्रात नमूद आहे.

वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी हत्या हे तिन्ही प्रकरण एकत्रित केले असून तिन्ही प्रकरण एकाच कारणातून घडल्याचा आरोप ही दोषारोप पत्रात करण्यात आला आहे. कट कुठे रचला याची माहिती आणि पुरावे सीआयडीच्या हातात आहेत. असंही दोषारोप पत्रात उल्लेख आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपलं

Salman Khan : सलमान खान ऐश्वर्या रायच्या प्रेमात होता वेडा, ब्रेकअपनंतर 'तेरे नाम' गाणं ऐकून ढसाढसा रडायचा

महामार्गावर भीषण अपघात! पहाटे वाहन डिव्हायडरला धडकले; ५ जणांचा मृत्यू, १ गंभीर जखमी

Dhantrayodashi Date : यंदा कधी आहे धनत्रयोदशी, १८ की १९ ऑक्टोबर? जाणून घ्या पूजा, मुहूर्त आणि महत्त्व

Heart Attack: धक्कादायक! भारतातील प्रत्येक तिसऱ्या मुलाला हॉर्ट अ‍ॅटॅकचा धोका, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT