Pune News : तुमचा होतो खेळ, बैलांचा जातो जीव, शर्यत जिंकण्यासाठी इलेक्ट्रिक शॉक; पुण्यातील संतापजनक प्रकार

Pune Ambegaon Bull Cart Race Electric Shock : आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी येथे जय हनुमान यात्रानिमित्ताने बैलगाडा शर्यतीच्या घाटात हा धक्कादायक प्रकार बघण्यास मिळाला.
Ambegaon bullock cart race electric shock
Ambegaon bullock cart race electric shock Saam Tv News
Published On

रोहिदास गाडगे, साम टिव्ही

पुणे : पुण्यात बैलगाडा शर्यतीचं तुफान क्रेझ आहे. दरवर्षी बैलगाडा शर्यती कोणत्या ना कोणत्या घाटात होत असतात. या शर्यंतीमध्ये काही अपघाताही होत असतात. मात्र, आता या बैलगाडा शर्यतींमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. बैलगाडांच्या मालकासाठी तर हा केवळ खेळ आहे, पण यात मुक्क्या प्राण्यांचा जीव जात आहे.

बैलगाडा शर्यतीच्या घाटात बैलाला पळविण्यासाठी चक्क बॅटरी लावून शॉक दिला असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार यात्रा कमिटीने उघड करत बैलाच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या बैलगाडा मालकाला शर्यतीच्या घाटातच खडेबोल सुनावत बंदी घालण्याचा इशारा दिलाय. आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी येथे जय हनुमान यात्रानिमित्ताने बैलगाडा शर्यतीच्या घाटात हा धक्कादायक प्रकार बघण्यास मिळाला.

Ambegaon bullock cart race electric shock
Maharashtra Politics : औरंगजेब क्रूर नव्हता, त्याच्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची लढाई नव्हती, आमदाराचं वादग्रस्त विधान

बैलाच्या मागच्या बाजूला बॅटरीचा शॉक दिला जात होता. या बैलगाड्यांवर घाटात बंदी घालत आयोजकांनी चांगलेच खडेबोल सुनावत इशारा दिलाय. उत्तर पुणे जिल्ह्यात जत्रा यात्रांचा उत्सव सुरुय. या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय अन बक्षिसही जोरदार असल्याने बैलगाडा शर्यत पहिल्या नंबरमध्ये यायला हवा म्हणून बैलगाडा मालकांचा बैलांच्या जीवाशी खेळ सुरु झाला. याविरोधात यात्रा कमिटी आणि बैलगाडा संघटना आक्रमक झालीय.

Ambegaon bullock cart race electric shock
Gaja Marne News : गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी; तरुणाला मारहाण भोवली, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com